कर्नाटक राज्यातील कावेरी नदीवर चामराजनगर जिल्ह्यात अत्यंत नयनरम्य निसर्ग लाभलेला हा Shivanasamudra falls निश्चितच आकर्षक आणि सौंदर्यसंपन्न आहे. कर्नाटक राज्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा उंच आणि आकर्षक धबधबा आहे. या धबधब्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया.
शिवसमुद्रम धबधबा,संक्षिप्त माहिती: Brief Information of Shivanasamudra Falls
ठिकाणाचे नाव : शिवसमुद्रम धबधबा
Famous name: Shivanasamudra falls.
कोठे आहे? कर्नाटक राज्य
नदीचे नाव : कावेरी
कावेरीचे उगमस्थान: ब्रह्मगिरी
उगमा पासून अंतर : 100 किलोमीटर
चामराज नगरपासून अंतर : 56 किलोमीटर
धबधब्याची उंची : 98 मीटर.
कसे जायचे शिवसमुद्रम धबधबा पाहायला ? How to go to see Shivanasamudra falls?
1. म्हैसूर या ऐतिहासिक [Historical] शहरापासून शिवसमुद्रम धबधबा [Shivanasamudra Falls] 65 किलोमीटर अंतरावर आहे. म्हैसूर (Mysore) पासून दीड तासात शिवसमुद्रम धबधबा पाहायला जाता येते.
2) मालवळ्ळी [Malavalli ] या गावापासून शिवसमुद्रम धबधबा (Shivanasamudra Falls) 22 किलोमीटर अंतरावर आहे. मालवळ्ळीतून अर्ध्या तासात धबधबा पाहायला जाता येते.
3) नेटकळ (Netkal) या छोट्याशा गावापासून शिवसमुद्रम धबधबा 10 किलोमीटर अंतरावर आहे.
Shivanasamudra fall: Island in Karnataka
कावेरी नदीवर असलेला हा Shiranasamudra falls अंत्यंत सुंदर आणि रमणीय ठिकाणी आहे. हा धबधबा मालवळ्ळी’, मंड्या, कोळ्ळेगळा, चामराजनगर च्या सीमारेषांना लागूनच आहे. या धबधब्याचे आणखी एक वैशिष्ट्य मध्ये मंड्या आणि चामराजनगर जिल्ह्यांच्या हद्दीत हा धबधबा येतो. या ठिकाणी दोन धबधबे आहेत.
1) भरचुकी धबधबा – Bharchukki falls.
2) गगन चुक्की धबधबा – Gaganchukki falls.
Bharchukki falls आणि Gagan chukki fall मिळून Shivanasamudra falls बनतो. येथील वेगाने वाहणारे पाणी आणि उंचावरून कोसळणारा धबधबा पाहताना मन, अंग शहारून जाते. कमी पावसाच्या वेळी या धबधब्याचे दृश्य टिपण्यासाठी आवश्य जावे.
हे सुद्धा आवर्जून वाचा