साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
रोमेन रोलँड
Romain Rolland
जन्म : 29 जानेवारी 1866
मृत्यू : 30 डिसेंबर 1944
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1915
रोमेन रोलँड या फ्रान्सच्या महान लेखकाची ‘जोक्रिस्तोफ’ ही सुप्रसिद्ध कादंबरी जगप्रसिद्ध आहे. ही कादंबरी त्यांनी दहा भागात लिहिली आहे. इंग्रजी भाषेत या कादंबरीचे तीन खंड आहेत. विसाव्या शतकातील एक अद्भुत रचना म्हणून या कादंबरीकडे पाहिले जाते. त्यांची नाटकेही प्रसिद्ध आहेत. त्यांना रहस्यवादी लेखक म्हणून संबोधले जायचे. महात्मा गांधीजी त्यांचे मित्र होते. गांधीजी त्यांना भेटायलाही गेले होते.