दक्षिण अमेरिकेतील घनदाट Amazon rainforest मध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. जलचर प्राणी आहेत. तसेच हे जंगल नाना प्रकारच्या पक्ष्यांचे वसतिस्थानही आहे. potoo हा एक असाच पक्षी आहे, जो फक्त अमेझॉनच्या जंगलात आढळतो. आकाराने छोटा असलेला हा पक्षी रात्रीच्या वेळी आपला टाठा उघडा ठेवून हवेत उडतो. अशा वेळी तोंडात येणारे सर्व कीटक त्याचे भृक्ष्य बनतात.शिकार करण्याची हीच त्याची पद्धत आहे.या potoo चा टाळा त्याच्या आकाराच्या मानाने खूप मोठा असतो. टाळा उघडल्यानंतर तो लालभडक दिसतो. potoo रात्रीच्या वेळी अन्न मिळवण्यासाठी संचार करतो. म्हणून त्याला ghost bird असे म्हणतात.पोटू दिवसभर निवांत झाडावर बसून राहतो.पोटूचे वर्णन करायचे झाले तर तो घुबडासारखा दिसतो, पण तो घुबड कुटुंबातील नाही. पोटू पक्षी लाजाळू आहे. तो माणसाच्या सानिध्यात विशेषतः येत नाही. त्याचे डोळे त्याच्या डोक्याच्या मानाने मोठे असतात, त्याच्या डोळ्यांचा उपयोग निशाचर प्राण्यांप्रमाणे असतात, त्याचे reflection होते. पोटू जेव्हा डोळे बंद करतो, तेव्हाही त्याला आपल्या शेजारील, जवळील हालचालीची चाहूल लागते. पोटू वाळलेल्या लाकडाच्या फांदीवर बसला तर तो आपल्याला दिसणारही नाही.
