दक्षिण अमेरिकेतील गयाना, अर्जेटिना, ब्राझील उरुग्वे, पेरू ,इक्वेटोर या देशांत आढळणारा हा Southarn Tamandua प्राणी Amazon rainforest चा एक अविभाज्य घटक आहे. या प्राण्याला दाक्षिणात्य तामांडुआ असेही म्हणतात.
उत्तर अमेरिकेत आढळणारा तामांडुआ हा थोडा काळसर असतो; तर दक्षिण अमेरिकेनी तामांडुआ हा काळा-तपकिरी-पिवळसर रंगाचा असतो. अँटिटरच्या आकाराचा हा प्राणी आपले अस्तित्व टिकवून आहे. तामांडुआ हा एक छोटासा प्राणी असून नर आणि मादी यांच्या आकारात फारसा फरक नसतो. या प्राण्याची लांबी 13 ते 35 इंचापर्यंत असते; तर वजन 2 ते 8 किलोग्रॅम पर्यंत असते. यावरून हा प्राणी आकाराने किती लहान आहे, याची कल्पना येते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेकरू प्राण्याइतका हा तामांडुआ लहान असतो. या तामांडुआचे डोळे खूप लहान असतात. दिसायला पण त्याची दृष्टी कमकुवत असते; पण त्याचे कान सतत सतर्क असतात. घ्राणेंद्रिय पण तीव्र असते. मुंग्या, मध, मधमाशा खाऊन हा तामांडुआ आपले गुजराण करतो.