दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती अमेरिकेच्या Amazon Rainforest मध्ये पुमा (Puma) हा प्राणी आढळतो. या Puma प्राण्यांचा छोटा म्हणजे आपल्या कुटुंबापुरता मर्यादित कळप असतो. पुमा हा दिसायला सिंहिणीसारखा असला तरी तो मार्जार कुळातील [Cat family] आहे. म्हणूनच पुमाला मोठे मांजर असे म्हटले जाते. नर पुमाचे वजन 55 ते 75 किलोग्रॅम असते, तर मादी पुमाचे वजन सुमारे 50 किलोग्रॅम असते.
पुमाला सिंह किंवा चित्ता म्हणता येणार नाही. त्याला मोठे मांजरच म्हटले पाहिजे; कारण तो मार्जार कुळातील आहे. पुमा आणि चित्ता यांची लढाई लागली तर निश्चितच पुमा जिंकेल. चित्ता हा भित्रा प्राणी आहे. तो केवळ शाकाहारी प्राण्यांची शिकार करतो. पुमा हा अमेरिकेत आढळत असला तरी भारतातही हिमालयीन प्रदेशात आढळतो. तो भारतासारख्या अन्य 23 देशांत आढळतो.
शेळ्या , मेंढ्या, बकरी, ससा, हरिण यांना तो पकडून खातो. हा प्राणी ताशी 60 ते 70 किमी वेगाने धावतो. त्यामुळे उघड्या माळावर हरणासारखे प्राणी तो पकडू शकत नाही.
हे सुद्धा आवर्जून वाचा