दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest या अवाढव्य जंगलात विविध प्रकारचे प्राणी आहेत. याच भव्य जंगलातील ॲमेझॉन या विशाल आणि जगातील सर्वांत मोठ्या नदीत 3000 प्रकारचे जलचर प्राणी आहेत. त्यांतील एक प्राणी Giant otter पाणमांजर होय. हा प्राणी मांजरासारखा दिसतो, पण पाण्यात राहतो.म्हणून या प्राण्याला पाणमांजर असे संबोधतात. Giant river otter हा पूर्णतः carnivorous म्हणजे मांसाहारी असून पाण्यातील तो इतर जलचर प्राण्यांची शिकार करून खातो. हे पाणमांजर सस्तन आहे. या पाणमांजराचे अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत लाखो वर्षांपासून अस्तित्व आहे. सर्वसामान्यपणे ही पाणमांजरे खूप शांतताप्रिय असतात. Giant otter हा एक सामाजिक प्राणी असून हे प्राणी आठ ते दहा सदस्यांच्या समुहात राहतात. काही पाणमांजरे ॲमेझॉन नदीच्या काठावरही वावरताना दिसतात. म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतात. कारण ते जमिनीवर आणि पाण्यातही वास्तव्य करू शकतात.