Amazon rainforest : Bush dogs

पृथ्वीतलावर कुत्र्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांतील सर्वांत हिंस्र कुत्री ही जंगली कुत्री असतात. दक्षिण अफ्रिकेतील जंगलातील कुत्री आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री यांत फरक आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री ती लांब केसांची असतात. Amazon rainforest मध्ये Bush dogs ही प्रजाती प्रामुख्याने आढळते. ब्राझील, पेरु, गयाना, सुरीनाम, इत्यादी देशांतील जंगलात हे प्राणी टोळ्यांनी आढळतात. बुश डॉग ही प्रजाती स्पीथोस वंशातील अस्तित्वात असलेली एकमेव प्रजाती मानली जाते. यांचे केस मऊ, लांब व सरळ असतात. त्यांच्या शरीराचा रंग फिकट तपकिरी- लालसर असतो. त्याची शेपटी नकळत झुपकेदार असली तरी साधारणतः ही कुत्री 10 ते 12 किलोग्रॅम वजनाची असतात. त्यांच्या शरीरयष्टीच्या तुलनेत पाय आणि कान लहान असतात; पण नाक मात्र तीव्र संवेदनशील असते. ही कुत्री समुहाने शिकार करतात. मारा, पकास यासारखे प्राणी ते शिकार करून लचके तोडून खातात. त्यांच्या जबड्यात 38 दात असतात. ही कुत्री दिवसा शिकार करतात. यांचा कळप खूप मोठा नसतो. समुहाने हल्ला करून 200 ते 300 किलोग्रॅम वजनाच्या प्राण्यावर विजय मिळवतात व त्यांना खाऊन टाकतात. सध्या दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या अंगलात खूप कमी प्रमाणात बुश कुत्री आढळतात.

Leave a comment