Amazon rainforest :Bamboo Plant: बांबू वनस्पती

आफ्रिका , दक्षिण अमेरिका, आशिया खंडात आढळणारे जगातील सर्वात उंच गवत म्हणजे Bamboo Plant होय. हे गवत Amazon rainforest मध्ये सु‌द्धा आढळते. प्रत्येक देश प्रदेश, खंड निहाय बांबूचे विविध प्रकार आढळतात. सँडर्स ड्रंकेना, रिबन ड्रंकेना, बेल्जियम एव्हरग्रीन, लकी बांबू, चायनीज बांबू असे विविध प्रकारचे बांबू आढळतात महाराष्ट्रात बांबूला चिवा, मेस, वेळू, वेत ,देवनळ अशी त्याच्या प्रकारानुसार नावे आहेत. वेळूचे गवत सर्वांत मोठे आणि जाड असते. घरबांधणीच्या कामात बांधकामाच्या सोयीसाठी हे वेळू वापरले जातात. तर चिव्यापासून मोठ्या टोपल्या, बुट्ट्या अशा अनेक वस्तू बनवतात. वेताचा बांबू सर्वात चिवट असतो. त्याच्यापासून खुर्च्या पण बनवतात. काही बांबू इनडोडार, आउट डोअर बागकामासाठी वापरतात. शोभेसाठी, सजावटीसाठी, कुंपणासाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. जंगलातील हत्तींचे बांबू हे मुख्य अन्न आहे. याशिवाय गवा (Bison) या प्राण्याला सुद्धा बांबूचे गवत खायला आवडते. गवे बांबूची पाने खातात, तर हत्ती बांबू मुळासकट उपटून खातात. बांबूच्या वनस्पतीची झटपट वाढ होते. याशिवाय ही वनस्पती ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करते. यामुळे तिला पर्यावरणपूरक वनस्पती असे म्हणतात.

Amazon rainforest : Brazil Nut Tree: ब्राझील नट वृक्ष

Leave a comment