ब्राझील हा देश फुटबॉल प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे.फुटबॉल क्षेत्रातील सर्व सत्ताधीश म्हणून ब्राझीलने आपली ओळख स्वकर्तुत्वाने निर्माण केली आहे. हाच ब्राझील देश दक्षिण अमेरिकेत आहे. याच देशातून जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी वाहत जाते. हा दश Amazon rainforest चा एक भाग आहे. विविध फळा-फुलांनी नटलेला देश, प्राणी आणि पक्ष्यांनी संपन्न असलेला देश. याच देशातील जंगलात कठीण कवच (Nut) असलेले फळ देणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाला Brazil Nut tree या नावाने ओळखले जाते. हे कठीण कवच असलेले फळ ब्राझील देशातील लोकप्रिय फळ आहे. या झाडाची साल खैराच्या झाडासारखी जाडी-भरडी-काटेरी आहे. फळ फोडल्यानंतर त्यांतील कर लालभडक गर आपल्याला पाहायला मिळतो.या झाडाचे वैज्ञानिक नाव Astrocaryum muramura असे आहे. या झाडाच्या फळापासून मुरुमुरु बटर (मुलायम लोणी) उत्पादन काढले जाते. हे लोणी मॉश्चरायझर म्हणून मोठया प्रमाणात वापरले जाते. त्वचेची कांती मऊ, मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी या लोण्याचा चांगलाच उपयोग होतो. या झाडाची उंची सुमारे 10 मीटर असते.या झाडाला नारळासारखी मोठमोठी फळे लागतात. या फळाचे कवच काढळल्यानंतर 20 ते 24 बिया पाहायला मिळतात.