वैशिष्ट्यपूर्णता आणि वैविध्यपूर्णता हे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. याच अमेझॉनच्या जंगलात नारळासारखे पण नारळापेक्षा लहान फळ लागणारे एक झाड आहे. या झाडाला टुकुमा पाम किंवा Astrocaryum Vulgare. असे म्हणतात. या पामच्या झाडाला वेगवेगळ्या देशात टुकुमा, गयाना, अवारा, मुरु-मुरु, चोटिला अशी नावे आहेत. या झाडाची उंची सुमारे 15 मीटरपर्यंत असते. सुपारीच्या झाडासारखे पेरापेरांनी खोड बनलेले दिसते. या पामच्या झाडाला केशरी रंगाची गोलाकार फळे लागतात. या फळामध्ये तेलकट तंतुमय, मांसल, पिवळसर-नारिंगी असा लगदा असतो. या फळाचे कवच टणक असते प्रत्येक फळाचे वजन सरासरी 30 ग्रॅम असते. या पामच्या झाडाच्या फळापासून तेल काढले जाते. हे वनस्पती तेल गरिबांचे तेल म्हणून ओळखले जाते. इतर खाद्यतेलापेक्षा पामचे तेल किंमतीने कमी असते. म्हणून गरीब देशात पाम तेलाला मोठी मागणी आहे.