Buddha- Part 8

गौतम बुद्धः संपूर्ण परिचय-भाग 8
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

लहानपणापासूनच बुद्ध हा शांतताप्रिय आणि एकांतप्रिय होता. बुद्ध अधून मधून आपल्या शेतावरही फेरफटका मारायला जात असे. जेव्हा त्याला काहीच काम नसे, तेव्हा त्याला एकांतवासात राहायला आवडत असे. अशा वेळी तो भारद्वाज या गुरूने शिकवलेल्या ध्यानधारणेचा उपयोग करून समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. बुद्धाला लहानपणी जेवढे बौ‌द्धिक शिक्षण दिले गेले, तेवढेच क्षात्रधर्माला आवश्यक असणारे युद्धकला विषयक शिक्षणही दिले गेले होते. बुद्धाचा बौ‌द्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी राजा शुद्धोदनने कोणतीही कसर सोडली नव्हती. सिद्धार्थ हा मुळातच दयाळूवृत्तीचा बनत चालला होता. त्याला कुणाचीही पिळवणूक केल्याची आवडत नसे. सिद्धार्थ एकदा असाच आपल्या मित्रांसोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला होता. त्यावेळी अर्धवट कपड्यांमध्ये कडक उन्हात काम करण्याऱ्या मजुरांकडे पाहून तो हळहळला. मुजुरांनी कष्ट करावे आणि त्यांच्या कष्टाच्या जिवावर मालकाने आपले जीवन सुखात जगावे, हे सि‌द्धार्थाला पटत नव्हते. हाच प्रश्न त्याने मित्रांना विचारले; पण मित्रांनी समाधानाचे उत्तर दिले नाही. उलट त्यांनी मजुरांच्या कामाचे समर्थन केले. ‘मजुरांचा जन्म हा चाकरी करण्यासाठीच आहे’ हे मित्रांनी दिलेले उत्तर सिद्‌धार्थ स्वीकारायता तयार नव्हता.

त्यावेळी शाक्य परंपरेनुसार ‘प्रमंगल’ नावाचा एक उत्सव कपिलवस्तूत साजरा केला जायचा. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवात धान्याची पेरणी केली जाते. महाराष्ट्रात आणि भारतातील बहुतांश भागात मृग नक्षत्रात पेरणी केली जाते , तशी या परंपरेनुसार जमिनीच्या मालकाने स्वतः आपल्या हाताने नांगर धरून पेरणी करण्याची पद्धत होती, सि‌द्धार्थाला या सणाची परंपरा पटायची. तो स्वतः आपल्या शेतात नांगर धरून पेरणीच्या कामात भाग घ्यायचा. त्याला या कामाची कोणतीही लाज वाटत नसे. त्याने शारीरिक श्रमाचा कधीही तिरस्कार केला नाही. सिद्धार्थाचा जन्म क्षेत्रीय कुळात झाला होता; पण त्याला शिकार करणे आवडत नसे. इतरांना निष्कारण इजा करणे त्याला पटत नसे. त्याचे मित्र त्याला शिकारीसाठी आग्रह करीत असत. त्यावेळी तो मित्रांना स्पष्ट नकार द्यायचा, मित्र त्याला चिडवायचेही. ‘तुला वाघाची भीती वाटते का ? असे म्हणायचे, पण सिद्धार्थ सडेतोड उत्तर द‌यायचा. ‘तुम्ही कुठे वाघाची शिकार करायला निघालात ? तुम्ही तर जंगलातील तुम्ही तर निरपराध प्राण्यांची शिकार करायला निघालात आणि मला निरपराध प्राण्यांना मारत असलेले पाहाय‌ला आवडत नाही!

सिद्धार्थच्या द‌याळूपणाच्या स्वभावामुळे महाप्रजापतीला चिंता या वाटायची की हा भविष्यात संन्यासी तर होणार नाही ना? म्हणून ती अधूनमधून सिद्धार्थला क्षेत्रीय असल्याची जाणीव करून देत असे.मग तो आईवर म्हणजे महाप्रजापतीवर प्रश्नांची सरबत्ती करे

“आई, क्षत्रियांना का लढावे लागते गं ?” आई म्हणायची ‘लढणे हा क्षत्रियांचा धर्म आहे त्यावर तो म्हणायचा. “पण आई, एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारणे हा धर्म कसा काय होऊ शकतो? आई म्हणायची, तू असा काय बोलतोस संन्यासासारखा ? मग तू आपल्या राज्याचे संरक्षण कसे करणार ? त्यावर सिद्‌धार्थ म्हणे, “आई, सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर लढाई किंवा हिंसा न करता राज्याचे रक्षण होणार नाही का?” सिद्‌धार्थच्या अशा प्रश्नातून आई निरुत्तर होई.

सि‌द्धार्थ मित्रांसमवेत फिरायला गेला की तो आपल्या मित्रांना समाधी लावण्यास सांगे व एकांतपणे मनात मी सुखी व्हावे, माझे कुटुंब सुखी व्हावे. सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत. अशा विचारांचा जप करायला सांगे. मित्रांना या सर्व गोष्टी नवीन होती. ते सिद्धार्थाची चेष्टा करत असते. मित्र जेव्हा डोळे बंद करत, तेव्हा यांचे मन एकाग्र होत नसे. त्यांच्या मनात डोळे बंद करूनही शिकारीचा विषय यायचा. सिद्धार्थाच्या माता-पित्याला हा ध्यानधारणेचा छंद आवडायचा नाही. त्यांना सिद्धार्थाला चक्रवर्ती सम्राट झालेला पाहायचे होते.

‘योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने समस्त विश्वातील मनुष्यावर, प्राणिमात्रावर प्रेमभावना वृंद्धिंगत होते’ यावर सि‌द्धार्थचा ठाम विश्वास होता. माणसामाणसात भेदाभेद करणे, असमानतेची वागणूक देणे हे सिद्धार्थला आवडत नसे. आपण मित्रांवर प्रेम करतो. पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो.मग असे प्रेम सर्वांवर का करु शकत नाही? अशी सिद्धार्थाची विचारधारा बनत होती. आईवडिलांना जे नको होते, तेच घडत होते.

Leave a comment