Amazon Rainforest: Passion flower

दक्षिण अमेरिकेतील विविध प्रकारच्या वनस्पतींपैकी एक सुंदर फूल लागणारी वनस्पती म्हणून Passion flower कडे पाहिले जाते. हे फूल म्हणजे Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. या पॅशन फ्लॉवरचे वैज्ञानिक नाव आहे. Passiflora incarnata. या फुलाला पॅशन वाईन्स असेही म्हणतात. जगात Passion flower च्या भरपूर प्रजाती आहेत. भारतातही आहेत. भारतात या प्रकारचे फूल आढळते, त्याला कृष्ण कमळ म्हणतात. या प्रकारची फुले लागणाऱ्या वनस्पतीमध्ये वेली, झुडपे आहेत. जगात या फुलांच्या 550 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. काही फुलांचा गंध दुर्गंधयुक्त असतो. केळीचे पॅशन फूल ब्राझीलमध्ये आढळते. निळ्या रंगाचे पॅशन फूल स्पेनमध्ये आढळते. या वनस्पतीकडे एक औषधी वनस्पती म्हणून पाहिले जाते. हे एफ उथळ बशीच्या आकाराचे फूल आहे. यांतील काही वनस्पतींना फळेही लागतात. प्रजातीनुसार पाकळ्यांच्या संख्याही वेगवेगळ्या असतात. या फुलांना साधारणतः 5 ते 10 पाकळ्या असतात. मानसिक विकार बरे करण्यासाठी या फुलाचा आणि फळाचा उपयोग करतात. या फुलांचे प्रजातीनुसार वेगवेगळे रंग असले तरी प्रत्येक फुलात निळसर रंग सहसा असतो.

Amazon Rainforest :Monkey Brush vine.

Leave a comment