साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
साल्वाटोर काझीमोडो
Salvatore Quasimodo
जन्म : 20 ऑगस्ट 1901
मृत्यू: 14 जून 1968
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष: 1959
साल्वाटोर काझीमोडो हे इटलीचे सुप्रसिद्ध कवी होतेच, त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट समीक्षक आणि अनुवादक होते. काझीमोडो दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे वर्णन करू लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्प काळातच सर्वत्र प्रसिद्ध झाले. ‘डे बाय डे’, ‘एंड सडन्ली इट इज इव्हनिंग’, ‘लाइफ इज न्यू ड्रीम’, ‘द मॅचलेस अर्थ’ इत्यादी त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.