• जिल्हाधिकारी (कलेक्टर) :
* जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते.
* ग्रामीण प्रशासनातील जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो.
जिल्हाधिकाऱ्याची निवड :
केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते.
जिल्हाधिकाऱ्याची कामे :
* जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे.
* जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहणे.
* जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्थेसाठी आवश्यक ती व्यवस्था लावणे.
* लोकांच्या अडचणी, तक्रारी ऐकून घेऊन योग्य तो तोडगा काढणे.
* जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतात.
* शेतीच्या वादविवादावर जिल्हाधिकारी निर्णय घेतात.
* जनगणनेचे काम दर दहा वर्षांनी जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली होते.
० 144 कलम लागू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.
* स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळोवेळी सल्ला देण्याचे काम जिल्हाधिकारी करतात.
* तहसीलदार :
* महसूल खात्याचा वर्ग 1 चा अधिकारी म्हणजे तहसीलदार होय.
* प्रत्येक तालुक्यास एक तहसीलदार असतो.
* महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची नेमणूक ‘तहसीलदार’ म्हणून करतात.
तहसीलदाराची कामे :
* तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून काम करतात.
* तालुक्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे.
* सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात तालुक्यातील निवडणुका तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पाडतात.
* मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये ‘मामलेदार’ या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडणे.
* मंडल अधिकारी, तलाठी इत्यादी तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली असतात.
तलाठी :
* महसूल खात्याचा गाव पातळीवरचा वर्ग 3 चा कर्मचारी म्हणजे तलाठी होय.
* तलाठ्याच्या कार्यालयास ‘सज्जा’ असे म्हणतात.
* प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.
तलाठ्याची कामे :
* ग्रामस्तरावर महसूल गोळा करणे. महसूल खात्याचे दप्तर सांभाळणे.
० शेतकऱ्यांना ‘७-१२’ व ‘८-अ’ चे उतारे देणे.
* जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद करणे.
* निवडणुकीच्या कामात मदत करणे.
* तहसीलदाराने सोपवलेली कामे करणे.
* कोतवाल:
* गावपातळीवर कोतवालला सहकार्य करणारा सर्वांत कनिष्ठ सेवक म्हणजे तलाठी’ होय.
* कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. 1000 लोकसंख्येपर्यंत 1 कोतवाल, 1001 ते 3000 लोकसंख्येपर्यंत 2 कोतवाल व 3001 च्या पुढे 3 कोतवाल असतात.
* कोतवालाला दरमहा 5000 रु. मानधन असते.
कोतवाल कामे:
* सरकारी पत्रव्यवहार पोहोच करणे.
* गावातील लोकांना आवश्यक त्या वेळी चावडीवर बोलावणे.
* जन्म, मृत्यू, विवाहाची माहिती ग्रामसेवकास देणे.
* तलाठी, पोलीस पाटील, सर्कल यांना त्यांच्या कामात मदत करणे,
* गावात दवंडी पिटून सरकारी सूचना जाहीर करणे.
* पोलीस पाटील :
* चांगली वर्तवणुक असलेल्या व्यक्तीची नेमणूक निवड चाचणीद्वारे उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी करतात.
* वयाच्या 60 वर्षांपर्यंत पोलीस पाटील पदावर राहू शकतो..
* पोलीस पाटील पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दरमहा 6000 रु. वेतन असते.
* पोलीस पाटलाच्या कार्यावर तहसीलदार व पोलीस स्टेशनचे नियंत्रण असते.
पोलीस पाटील कामे:
* गावात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे.
* स्थानिक पातळीवरील गुन्ह्याच्या चौकशीस पोलिसांना सहकार्य करणे.
* गावात संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकाऱ्याला तशी माहिती देणे.
* नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारास कळवणे.