District Council Maharashtra State: जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत वरचा स्तर म्हणजे ‘जिल्हा परिषद’ होय.

* महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत.

* वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या.

* मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा वगळून इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा       परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात.

१) जिल्हा परिषदेची रचना :

* जिल्हा परिषदेत मतदार संघाच्या प्रमाणात सदस्य असतात.

* जिल्हा परिषदेत 50 ते 75 सदस्य असतात.

* प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातून दोन पंचायत समिती सदस्य निवडून जातात.

* जिल्हा परिषदेत 50 % जागा स्त्रियांसाठी राखीव असतात.

* जिल्हा परिषदेत 27% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव असतात.

* कार्यकाल : जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

* जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रमुखास ‘अध्यक्ष’ असे म्हणतात.

२) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष :

* जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाला आरक्षणानुसार अध्यक्ष म्हणून निवडतात.

० त्याचबरोबर आपल्यापैकी एकाला ‘उपाध्यक्ष’ म्हणून निवडतात.

* अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल अडीच वर्षांचा असतो.

* जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो.

* अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना दरमहा मानधन व सवलती असतात.

* जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.

३) जिल्हा परिषदेच्या समित्या :

जिल्हा परिषदेच्या एकूण 10 समित्या असतात. एक स्थायी समिती व इतर नऊ विषय समित्या असतात.

जिल्हा परिषद विषय समित्या :

(१) वित्त समिती, (२) बांधकाम समिती, (३) कृषि समिती, (४) समाज कल्याण समिती, (५) शिक्षण व क्रीडा समिती, (६) आरोग्य समिती, (७) पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, (८) महिला व बालकल्याण समिती, (९) जलसंधारण व पिण्याचे पाणी पुरवठा समिती.

स्थायी समिती :

* स्थायी समिती ही सर्वांत महत्त्वाची समिती असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात,

* उपमुख्य कार्यकारी स्थायी समितीचे सचिव असतात.

* नऊ समित्यांचे सभापती स्थायी समितीचे सदस्य असतात.

* जिल्हा परिषदेच्या सदस्यांची त्यांच्याकडून निवडलेले आठ सदस्य स्थायी समितीचे सदस्य असतात.

* विशेष ज्ञान असलेले दोन सहयोगी सदस्य असतात.

4) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):

* जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणतात.

* मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भारतीय प्रशासकीय सेवेतून नेमणूक झालेली असते.

* मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी दर्जाचा असतो,

* मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मदतीस एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची कामे :

* जिल्हा परिषदेच्या कारभारावर देखरेख ठेवणे.

* जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामांची तपासणी करणे.

* जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे.

* शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे.

५) जिल्हा परिषदेची कामे :

* जिल्ह्याच्या विकासाच्या योजना आखून अमलबजावणी करणे,

* शेती विकास, बी-बियाणे पुरवणे.

* शाळांना भौतिक सुविधा पुरवणे.

* लघु पाटबंधारे व पाझर तलावांची निर्मिती करणे.

* शाळा, वाचनालये, आश्रमशाळा, वसतिगृहे चालवणे.

* कुरणे व चराऊ रानांची देखभाल करणे.

* प्राथमिक आरोग्य केंद्राची देखभाल करणे, कुटुंब नियोजन, लसीकरण, आरोग्याच्या सुविधा पुरवणे.

* ग्रामीण रोजगार योजना, रोजगार हमी योजना राबविणे.

* हस्तोद्योग, कुटिरोद्योग व दुग्धशाळा यांना उत्तेजन देणे.

६) जिल्हा परिषद उत्पन्नाची साधने :

* पाणी कर, करमणूक कर, यात्रा कर, बाजार कर, व्यवसाय कर.

* जमीन महसुलातील ठरावीक रक्कम.

* राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान.

* विकास योजना संदर्भात अनुदाने.

* शासकीय कर्जे.

Leave a comment