freedom fighter or traitor debate-स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्यवैरी

राहुल गांधी यांनी युकेमध्ये सावरकर यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला होता.अर्थात तो किस्सा चित्रगुप्त यांच्या पुस्तकातील होता. हे चित्रगुप्त कोण? तर स्वतः सावरकर आणि त्या किस्स्यामुळे सावरकरांची मानहानी झाली असा आरोप ठेवून सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील विशेष न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सध्या चालू आहे. या सुनावणीत सात्यकी सावरकर यांनी स्वतः कबूल केले की विनायक दामोदर सावरकर यांना सरकारने स्वातंत्र्यवीर ही पदवी दिलेली नाही. एवढेच नव्हे तर लोकातूनही पदवी दिलेली नाही. मग त्यांना कोणी पदवी दिली? विनायक दामोदर सावरकर यांनी चित्रगुप्त या टोपणनावाने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर असे स्वतःलाच उपमा दिलेली आहे. ते पुस्तक सावरकरांनीच लिहिले आहे. हे सात्यकी सावरकरांनी कबूल केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी मानहानीची केस नोंदवल्यामुळे सावरकरांचे खरे खरे रूप जनतेसमोर येत आहे. सावरकर यांनी तुरुंगात असताना सहा वेळा माफीचे पत्रे इंग्रज सरकारला दिलेली आहेत.म्हणून त्यांना राहूल गांधी माफीवीर सावरकर असेही म्हणतात. त्याचाही सावरकर प्रणित अंधभक्तांना खूप मोठा राग आला आणि त्यांनी आंदोलने केली; पण आजही ती माफीचीपत्रे अनेकांकडे उपलब्ध आहेत. राहूल गांधी यांच्याकडेही आहेत. अनेक अभ्यासकांच्याकडेही ही पत्रे आहेत. सावरकरांनी माफीमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे, की मला तुम्ही माफ केले तर मी तुमच्यासाठी काम करीन. सावरकरांच्या विनंतीनुसार त्यांना 1925 साली तुरुंगातून सोडल्यानंतर त्यांनी इंग्रजांसाठीच काम केले. इकडे स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस इंग्रजांविरोधी लढण्यासाठी सैन्यांची फौज निर्माण करत होते आणि इकडे सावरकर इंग्रजांच्या सैन्यात जा म्हणून लोकांना सल्ला देत होते. असे होते खरे सावरकर; पण लोकांच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रतिमा निर्माण करण्याचे काम केलेले आहे. सावरकर एक उत्तम लेखक होते. त्यांच्या लेखणीमध्ये दम होता. हे सर्वमान्य आहे; पण स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान काय? हा प्रश्न आजही कुणालाही समर्थनीय पुरावे मिळाले नाहीत. कारण त्यांचे योगदान कुठेच दिसत नाही. उलट इंग्रजांना सहकार्य केल्याचे अनेक पुरावे सापडत आहेत. ज्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणून आज अनेक अंधभक्तांसह सरकारही डोक्यावर घेत आहे.त्या सावरकरांचा खरा चेहरा आज न्यायालयासमोर येत आहे. म्हणून लोकहो जागरूक व्हा सत्य इतिहास वाचा आणि विश्वास ठेवा.

स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्याचे शत्रू? आचार्य अत्रे

आचार्य अत्रे यांनी एका वर्तमानपत्रात स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्य शत्रू? या शीर्षकाखाली सावरकरांचे खरे रूप सांगणारा लेख लिहिला आहे. असे अनेक पुरावे सावरकरांच्या खऱ्या वस्तुस्थितीची ओळख करून देत आहेत. आता आचार्य अत्रे पण खोटे बोलतात का? एक माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांनी लिहिले आणि त्यात आपल्याला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या हे लिहिले आहे.अर्थात तेथे अंदमान निकोबारमध्ये असणाऱ्या अनेक कैद्यांपैकी सावरकर हे एक होते. अनेकांनी यमयातना सोसल्या. हालअपेष्टा सोसल्या;पण त्यांनी माफी मागितली नाही. त्या तुरुंगात अखंड कैद्यांपैकी दोन व्यक्तींनी माफीनामे मागितले. त्यापैकी सावरकर एक. मग त्यांना स्वातंत्र्यवीर कसे म्हणून चालेल? ज्यांनी बलिदान दिले आत्माहुती दिली तेच खरे स्वातंत्र्यवीर. न्यायालयाच्या या सुनावनीमुळे बरेच काही स्पष्ट होत आहे; सध्याच्या खटल्याबाबत वर्तमानपत्रात बातम्या येतात;पण कुठेतरी त्या कोपऱ्यामध्ये येतात. हीच बातमी जर सावरकरांना पोषक असती तर वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये सर्व बातम्या आल्या असत्या. हे पण मीडियाचे दुर्दैव आहे.

लोकहो जागरूक राहा. सत्य इतिहास वाचा. सत्याची पाठराखण करा आणि सत्याच्या पाठीशी राहा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

शब्दांकन:संभाजी पाटील

Leave a comment