US Iran war update-अमेरिका-इराण शांती चर्चा:काय होणार पुढे?

पाकिस्तानच्या मध्यस्थीने आणि चीनच्या आतून सपोर्टमुळे अमेरिका- इराणी- इस्राईल युद्ध थांबले असले तरी ते पूर्ण थांबलेले नाही. शीतयुद्ध चालूच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सीझ फायर झाल्यानंतर इस्रायलने लेबेनॉनवर हल्ले केले. ही गोष्ट इराणला खटकली. कारण इराणने सीझ फायर करण्यापूर्वी दहा मुद्दे अमेरिका आणि इस्रायल समोर ठेवले होते. त्या मुद्द्याला अनुसरून चर्चा झाली आणि सीझ फायर झाले. इराणचे बहुतांश 10 मुद्दे अमेरिकेने मान्य केले.यामध्ये लेबनॉनचा मुद्दाही होता. त्या मुद्द्याला इस्रायलने तडा दिला आणि लेबनॉनवर हल्ले चालू ठेवले. त्याचा परिणाम म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली. खरे तर युद्ध थांबले म्हणून संपूर्ण जगाला आनंद झाला होता; पण अजूनही शह-काटशह यांचे राजकारण चालूच आहे. तिकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पत यांच्या विरोधात महाभियोगाचा ठराव लागू करण्याची तयारी चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाच्या दरम्यान इराण बेचिराख करू. इराणची संस्कृतीच नष्ट करू. अशा प्रकारची विधाने केल्यामुळे अमेरिकेत तीव्र संताप उमटले आहेत आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचे पद धोक्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदापेक्षा संपूर्ण जगात शांतता राहणे हे सगळ्यात महत्त्वाचे असून संपूर्ण जगाच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच अमेरिका- इराण- इस्रायल सीझ फायर झाल्यानंतर जगामध्ये काहीसे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.शेअर बाजारामध्येही प्रचंड उसळी निर्माण झाली होती. तेलाचे भाव गडगडल्यामुळे महागाईचा ताण कमी झाला होता; पण ही परिस्थिती अद्यापही निवडली नसल्याने पुन्हा एकदा युद्ध सुरू होते की काय? असा प्रश्न मनामध्ये येतो.अमेरिकेने इस्रायलवर थोडे का असेना दडपण आणून पूर्ण शांतता कशी राहील हे पाहिले पाहिजे. तरच सीझ फायरनंतर चर्चेच्या वाटाघाटीला चांगले वळण लागेल आणि जग सुटकेचा निश्वास टाकेल.

Leave a comment