India’s leap into AI technology ?AI तंत्रज्ञानात भारताची उडी ?

AI म्हणजे Artificial Intelligence होय. AI या कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकन तंत्रज्ञांनी Aria ही AI तंत्रज्ञानातून विकसित केलेली Girlfriend निर्माण केलेली आहे. या गर्लफ्रेंडचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतानेही या AI तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यासाठी कंबर कसली आहे. पाश्चात्य आणि विकसित देशांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारताला AI तंत्रज्ञानाच्या विकासावर भरीव स्वरुपाचे काम करावे लागेल.

Chat-GPT, AI Partner यांसारख्या तंत्रज्ञानाला टक्कर देण्यासाठी भारताला AI तंत्रज्ञानात खंबीर पावले उचलण्याची गरज आहे. Start up आणि संशोधकांसाठी common computing सुविधांतर्गत 18693 GPU म्हणजेच Graphics Processing Unit तैनात करण्याची घोषणा भारताच्या IT विभागाने केलेली आहे. AI चे जागतिक केंद्र हे भारत असावे यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे IT विभागातर्फे सांगितले जाते. ISRO च्या गरुडभरारीप्रमाणेच AI ने ही भारतात गरुडझेप घ्यावी, हीच तमाम भारतीयांची इच्छा आहे.

Preference for Indian languages ​​in AI?AI मध्ये भारतीय भाषांना प्राधान्य ?

AI तंत्रज्ञानात भारतीय भाषांना प्राधान्य दिल्यामुळे हे तंत्रज्ञान झपाट्याने आत्मसात करण्यात मदत होईल. हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असेल. विविध कंपन्यांना कॉम्प्युटिंग सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे 40% आर्थिक मदत केली जाईल. शिवाय इतर देशांच्या तुलनेत भारतात computing सुविधा किमान 1doller प्रति तास इतक्या स्वस्त दरात उपलब्ध होईल. नजीकच्या वर्षभरातच Computing सुविधा उपलब्ध करून देण्यास भारत सक्षमपणे पावले उचलेल, अशी आशा आहे.

चीनच्या डीप सीक ला भारतीय सर्व्हरवर host केले जाण्याची शक्यता आहे; पण हे डीपसीक वापरताना काळजी घ्यावी लागेल.

Leave a comment