Chatrapati Sambhaji Maharaj-संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय झाले? स्वराज्याचे दोन तुकडे- वाचा सविस्तर

छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले. पकडल्यानंतर त्यांना तुळापुरला नेले. तेथे त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले? तेच आपण पाहूया.

झुल्फीकारखानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबा घाटातूनच पुण्याकडे तुळापूरला नेले. तेथे त्यांची हाल हाल करून हत्या केली. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबने त्यावेळी दोनच प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न म्हणजे स्वराज्याचा खजिना कोठे आहे? आणि दुसरा प्रश्न म्हणजे मुघलांमधील कोण कोण फितूर आहे ,जे तुम्हाला मदत करत होते? छत्रपती संभाजी महाराज यांना माहीत होते की आपण कितीही खरे बोललो किंवा स्वराज्याचा संपूर्ण खजिना जरी त्याच्या ताब्यात दिला तरी तो आपल्याला जीवे सोडणार नाही. त्यामुळे औरंगजेबच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास संभाजी महाराजांनी नकार दिला. आपण विचारलेल्या दोन प्रश्नांची संभाजी महाराज यांनी खरी उत्तरे दिल्यास त्यांना जीवदान देण्यात येईल ,पण आयुष्यभर औरंगजेबच्या तुरुंगात राहावे लागेल. हे औरंगजेबने स्पष्ट केले होते. पण औरंगजेबच्या या प्रस्तावावर संभाजी महाराजांनी लाथ मारली आणि मृत्यूला सामोरे गेले.

औरंगजेबची अशी धारणा होती की संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यामुळे स्वराज्यात घबराहट पसरेल आणि आपल्याला स्वराज्य पूर्णपणे जिंकता येईल. पण त्यांचा अंदाज चुकला .त्यांना स्वराज्य कधीच जिंकता आले नाही आणि ते नेस्तनाबुतही करता आले नाही.

स्वराज्याचा नवा छत्रपती..राजाराम महाराज

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात काही काळ अस्तावेस्तता आली. सगळे गोंधळून गेले, पण राणी येसूबाई यांनी खंबीरपणे परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली. त्यांनी आपला पुत्र शाहू याचा राज्याभिषेक न करता राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि रायगडहून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली.

11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबने स्वराज्यातील अनेक किल्ले पटापट घेण्यास सुरुवात केली. 25 मार्च 1689 रोजी झुल्पीकारखानाने रायगडला वेढा दिला. रायगड आणि स्वराज्य धोक्यात आहे , हे राणी येसूबाई यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती केले आणि 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराजांना गुप्त मार्गाने रायगडावरून पलायन करण्यास मदत केली. स्वराज्याचा राजा जिवंत राहिला पाहिजे , तरच स्वराज्य पुढे टिकणार आहे हे राणी येसूबाई यांनी ओळखले होते. राणी येसूबाई यांनी स्वार्थ न ठेवता शाहू लहान असल्याने त्याला गादीवर बसवले नाही.

रायगड ते जिंजी

राजाराम महाराज रायगडवरून निघून प्रतापगडला गेले. तेथे काही दिवस काम करून तेथूनही ते राणी ताराबाई यांना मागे ठेवून निवडक विश्वासू साथीदार घेऊन जिंजीच्या दिशेने निघून गेले.

इकडे राणी येसूबाई यांनी रायगड निकराने लढवण्यास सुरुवात केला. तिने हार मानली नाही, पण सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे झुल्फिकारखानाचे सैन्य गुप्त मार्गाने गडावर शिरले आणि अशा प्रकारे नऊ महिने निकराचा लढा देऊनही रायगड शत्रूच्या ताब्यात गेला. स्वराज्याची राजधानी शत्रूचेच्या ताब्यात गेली. राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद करून झुल्पीकारखान्याने त्यांना औरंगजेबच्या स्वाधीन केले. पुढे 29 वर्षे राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना औरंगजेबच्या कैदेत काढावे लागले.

स्वराज्याचा कारभार जिंजीहून

इकडे मजल दर मजल करत छत्रपती राजाराम महाराज अनेक संकटांना सामोरे जात जिंजीला पोहोचले. राजाराम महाराज यांनी जिंजीला पोचल्यानंतर स्वराज्यातील कारभाऱ्यांना पत्र लिहून स्वराज्य टिकवण्याचे आणि औरंगजेबशी नेटाने लढा देण्याचे कळवले होते.महाराणी ताराबाई सुद्धा काही काळ जिंजीला वास्तव्य करून होत्या.राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांची नेमणूक केली होती. संताजी आणि धनाजीने महाराणी ताराबाईच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. संताजीने तर औरंगजेबच्या तंबूच्या कळस कापून आणला होता आणि त्याचा नजराना राजाराम महाराजांसमोर ठेवला होता. औरंगजेब हताश होत होता, पण त्याने स्वराज्य बुडवण्याचे स्वप्न मागे ठेवले नाही. संताजीचा भाऊ बहिर्जी याच्याशी संधान बांधून धनाजी आणि संताजी यांच्यात वैर निर्माण करण्यास आणि राजारामाच्या नजरेतून संताजी बद्दल संशय निर्माण करण्यास औरंगजेब यशस्वी झाला होता. संताजीवर फितुरीचा ठपका ठेवल्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यानंतर स्वराज्याला लाभलेला खंबीर सेनापती स्वराज्याने गमावला. संताजी स्वराज्य सोडून गेला, पण औरंगजेबास तो मिळाला नाही. संताजी एकटा पडला आहे, ही संधी औरंगजेबने हेरली आणि त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार मारले. स्वराज्याने अशा प्रकारे खूप मोठा सेनापती गमावला. पुढे धनाजी कडे स्वराज्याच्या सरसेनापतीची धुरा आली.

जिंजीला वेढा

राजाराम महाराज जिंजीहून स्वराज्याचा कारभार पाहत होते. राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबने झुल्फिकारखानाला जिंजीच्या दिशेने पाठवले होते. जुल्फिकार खान अजगरासारखा जंजीला आठ वर्षे वेढा देऊन बसला होता. यावेळी अनेक वेळा झुल्फिकारखानावर संताजी धनाजी ने हल्ले केले होते. एक वेळ तर अशी आली होती की झुल्फीकारखानाचा पूर्ण पराभव झाला होता. त्यावेळी तो राजाराम महाराजांना शरण आला. राजाराम महाराजांनी झुल्फिकारखानला अभय दिले आणि सोडून दिले. पुढे कधीतरी त्याचा उपयोग येईल म्हणून हा डाव खेळला होता. झुल्फिकारखान या राजाराम महाराजांच्या उपकाराला जागला आणि तेथून पुढे तो पुन्हा वेढा घातल्यावर आपण लढत आहोत असे नाटक करू लागला. तिकडे स्वराज्यात औरंगजेबची मूठ सैल होत चालली होती. त्यामुळे राजाराम महाराजांनी जिंजीहून स्वराज्यात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गणोजी शिर्के आणि आतून झुल्फिकारखानने राजाराम महाराजांना मदत केली. त्यामुळे राजाराम महाराज स्वराज्यात आले.

राजाराम महाराज स्वराज्यात येण्यापूर्वी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबच्या सैन्याचे कंबरडे मोडले होते. कठीण परिस्थितीवर मात करून निकराची झुंज दिली होती. राजाराम महाराज स्वराज्यात आले खरे पण त्यांचा इसवी सन 1700 मध्ये सिंहगडावर मृत्यू झाला.

स्वराज्याची सूत्रे महाराणी ताराबाईकडे

राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यावर पुढील सात वर्षे महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य टिकवले. केवळ स्वराज्य टिकवलेच नाही तर औरंगजेबच्या ताब्यातील अनेक प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला. स्वराज्याचे सैन्य वाढवले. स्वराज्य बळकट केले. तूटपुंजा सैन्यांसह महाराणी ताराबाई यांनी जो लढा दिला, त्या लढायला जगात तोड नाही. अशा प्रकारचा लढा जगात कोणी दिला असेल असे वाटत नाही असे इतिहासाचे इंग्लंडमधील प्रोफेसर रिचर्ड ईटन याने म्हटले. महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य आणि शिवरायांचे विचार टिकवून ठेवले. महाराणी ताराबाई समोर औरंगजेब पूर्ण मोडून पडला होता. त्याचा संपूर्ण पराभव पुढे दिसत होता. सैन्यांचे हाल झाले होते. सैन्यांमध्ये लढण्याची इच्छा नव्हती. याचाच फायदा घेऊन महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबच्या सैन्याचे कंबरडे मोडले होते. अखेर 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. त्याला महाराष्ट्र भूमीतच दफन करण्यात आले. महाराणी ताराबाई ने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात जो लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही.

स्वराज्यात दुही

औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी महाराणी येसूबाई व पुत्र शाहू यांना सोडून दिले. आणि आपणही उरल्या सुरल्या सैन्यांसह दिल्लीला रवाना झाले. इकडे महाराणी ताराबाई यांचा कणखर स्वभाव आपल्या पथ्यावर पडणार नाही, हे ओळखून बाळाजी विश्वनाथने शाहूला साथ दिली आणि शाहू व महाराणी ताराबाई यांच्यात वैर निर्माण करून आपण शाहूंच्या बाजूने लढला. या गोष्टीमुळे स्वराज्याचे दोन तुकडे झाले. दोन राजधान्या झाल्या. कोल्हापूरची गादी महाराणी ताराबाई यांना मिळाली, तर सातारची गादी शाहू महाराज यांना मिळाली.

Leave a comment