नोबेल शांतता पुरस्कार विजेते
चार्ल्स अल्बर्ट गोबट
Charles Alber Gobat
जन्म: 21 मे 1843
मृत्यू : 16 मार्च 1914
राष्ट्रीयत्व: स्विस
पुरस्कार वर्ष: 1902
एक प्रतिभासंपन्न लेखक म्हणून चार्ल्स अल्बर्ट शोबाट यांची जगभर ख्याती होती. सर्वगुणसंपन्न व अभिजात कौशल्य त्यांना लाभले होते. परोपकार हा त्यांचा स्थायीभाव होता. चार्ल्स गोबाट हे एक कुशल प्रशासक होते.
राजनीतिज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये विविध प्रकारची पदे भूषविली होती. एली ड्युकोमन आणि. चार्ल्स गोबाट यांना विश्वशांतीसाठी केलेल्या मौल्यवान लेखनाबद्दल विभागून नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन करून आपल्या लेखन शैलीची कीर्ती जगभर पसरवली होती.