AI Technology – AI तंत्रज्ञानात भारताची गरुड झेप

AI तंत्रज्ञानात म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताने गरुड झेप घेतली आहे. सध्या AI तंत्रज्ञानात अमेरिका, चीन यासारख्या प्रगत देशांना टक्कर देण्याचे काम भारताला करायचे आहे.

भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील अभियान

भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात खंबीर पावणे उचलण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करण्यासाठी इंडिया एआय मिशन मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या अभियानासाठी केंद्र सरकारने सुमारे दहा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगामी पाच वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध घटकांना चालना देण्यासाठी आणि योग्य नियोजन करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल. या मिशन अंतर्गत विविध अनुप्रयोग विकसित करण्यात येतील. यासंबंधीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रारूपाच्या सुरुवातीलाच सुमारे दहा हजार जीपीयूच्या संगणकीय सुविधेची उपलब्धता केली आहे. लवकरच पुढील आणखी दहा हजार जीपीयू धरले जातील अशी आशा आहे.

GPU विषयक पायाभूत सुविधा

भारत सरकारने India AI mission अंतर्गत वर्षभरातच क्रांतिकारी प्रगती केली आहे. 18693 GPU पक्षामध्ये प्रचंड कार्यक्रमाचा असलेली एक मजबूत सामान्य संगणकीय सुविधा तयार करण्यासाठी भारताला यश आले आहे. त्यामुळे deepseek पेक्षाही नऊ पटीने जास्त आणि चॅट जीपीटीपेक्षा जास्त क्षमतेने भारताची ही सुविधा काम करेल. सध्या जागतिक पातळीवर जीपीयू ची किंमत प्रति तास अडीच ते तीन डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय रुपयात अडीशे ते तीनशे रुपये प्रति तास आहे.

AI चा माहितीसाठा संग्रह स्वरूपात

भारत सरकारने AI च्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि सर्वांना वापरासाठी खुले असलेला माहितीसाठी उपलब्ध होईल या दृष्टीने भारत सरकार सक्रियपणे काम करत आहे. त्यामुळे भारतीय स्टार्टर आणि संशोधकांसाठी माहितीसाठी एक सामायिक व्यासपीठ निर्माण होऊ शकेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात गती प्राप्त होईल. तंत्रज्ञान विषयक माहितीसाठ्याच्या व्यासपीठावर व्यक्तीची गोपनीयता राखली जाईल अशा पद्धतीने माहितीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

AI centers of excellence

भारत सरकारने नवी दिल्ली येथे शेती, आरोग्य आणि शाश्वत शहरांवर भर असलेल्या तीन AI centers of excellence ची स्थापना केली आहे. त्यादृष्टीने 2025 च्या अर्थसंकल्पातही 500 कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे.

India’s LLMS

AI अभियान तंत्रज्ञान अंतर्गत भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक स्वदेशी प्रारूपे आणि भाषाविषयक मोठ्या व्याप्तीची प्रारूपे तसेच भाषाविषयक लघु व्याप्तीची प्रारूपे विकसित करण्याचा प्रस्ताव देखील तयार करण्याचे काम चालू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत भारत सरकारची एक उल्लेखनीय यश म्हणजे डिजिटल इंडिया भाषीनी होय. या डिजिटल इंडिया भाषिनी द्वारे विविध भाषांचा अनुवाद करणारे तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध होईल. या व्यासपीठामुळे भारतीय भाषांत इंटरनेट आणि डिजिटल सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रगती करण्यास मदत होणार आहे.

चित्रलेखा व्यासपीठ

चित्रलेखा व्यासपीठ हे असे आहे की हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले असून चित्र भीतींचा भावनात्मक संदर्भ कायम ठेवून ते आपल्यास हवे त्या भाषेत परावर्तित करता येते. ए आय फोर भारत या उपक्रमांतर्गत हे चित्रलेखा व्यासपीठ निर्माण केले आहे. या व्यासपीठामध्ये ज्या चित्रलेखा आहेत म्हणजे ज्या चित्रफिती आहेत त्या ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत त्या चित्रफिती भारतीय नागरिकांना विविध भाषांमध्ये परावर्तित करता येतील किंवा आपल्याला हव्या त्या भाषेत चित्रफिती पाहता येतील.

हनुमान व्यासपीठ

भारत सरकारने हनुमान व्यासपीठ निर्माण करताना भाषाविषयक लघुव्याप्तीच्या प्रारूपाअंतर्गत म्हणजेच SDLMs या उपक्रमांतर्गत एवरेस्ट 1.0 या व्यासपीठाचा प्रारंभ केला आहे. सध्याही प्रणाली हिंदी तामिळ तेलगू बंगाली इत्यादी भाषांमध्ये काम करते. भविष्यात या प्रणाली अंतर्गत भारतात विविध पस्तीस भाषा उपलब्ध करून दिल्या जातील.

भारतजेन

जनरेटिव्ह ए आय या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित भारतजेन हा उपक्रम भारत सरकारने दिल्लीत 2024 साली सुरू केला. नागरिकांमधला परस्पर संवाद विस्तारित करण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वितरण करण्यासाठी या मूलभूत प्रारूपाचा संच विकसित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची रचना केलेली आहे. भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील सर्वोत्तम प्रतिभेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक संशोधकांचा या उपक्रमात समावेश असेल.

Leave a comment