नोबेल शांतता पुरस्कार विजेते
आंतरराष्ट्रीय विधी संस्था
Institute of International Law
स्थापना: 1873, बेल्जियम
पुरस्कार वर्ष: 1904
‘आंतरराष्ट्रीय विधी संस्था’ ही जगातील पहिली संस्था आहे की जिला आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार 1904 साली देण्यात आला. ही संस्था बेल्जियममध्ये स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कायदे तज्ज्ञ आणि राजनीतिज्ञ यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. ‘आंतरराष्ट्रीय विधी संघटना’ स्थापन करण्यासाठी बेल्जियम देशाचे डॉ. एलिन यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. ते आंतरराष्ट्रीय कायदा समीक्षा संघटनेचे संपादक होते.
‘आंतरराष्ट्रीय कायदा संस्था’ या संघटनेचे कार्य कायद्याची व्याख्या तयार करणे, ती नियमबद्ध करणे, कायद्यासंबंधित प्रश्नांचे, समस्यांचे निराकरण करणे इत्यादी आहे. या संस्थेने आंतरराष्ट्रीय नियमांशी संबंधित एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे Observances of Warfacre’.