आणखी दोनशे वर्षांनी जपान हा देश नामशेष होणार असे म्हटले जाते, त्यामागील नेमके काय कारण आहे? हे भाकीत कोणी ज्योतिषाने केले आहे का? का जपानचा जन्मदर प्रचंड प्रमाणात घटक चालला आहे! जाणून घेऊया जपान देशाच्या लोकसंख्येची कथा.
*जपान देश
दुसऱ्या महायुद्धात जपान हा देश खूप गाजला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका तशी थोडीफार तटस्थच होती; पण अंतिम टप्प्यात अमेरिकेला या युद्धात झोकून द्यावे लागले. जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बेटावर बॉम्ब फेक केली. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने जपानच्या बाबतीत टोकाचे पाऊल उचलले.
6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटल बॉय हा अणुबॉम्ब फेकला. त्यामुळे हिरोशिमा शहर जवळजवळ नामशेष झाले. जपानला या गोष्टीचा मोठा धक्का बसला.
9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने पुन्हा जपानच्या नागासाकी या शहरावर फिट मॅन हा अणुबॉम्ब टाकला. त्यामुळे हिरोशिमा शहरासारखीच अवस्था नागासाकी या शहराची ही झाली. जपानमध्ये कोलाहल माजली. सारा देश दुःखाच्या डोंगरात बुडाला. जपानने दुसऱ्या महायुद्धातून माघार घेतली. बिनशर्त शरणागती पत्करली. महायुद्ध थांबले पण जपानचे नुकसान लवकर भरून येण्यासारखे नव्हते.
*जपानची फिनिक्स पक्षासारखी झेप
दुसऱ्या महायुद्धातील मानहानीकारक पराभवामुळे जपान चांगलाच खचून गेला होता, पण याच जपानने नजीकच्या 25 वर्षांच्या कालावधीत प्रचंड एकसंधता दाखवून देश प्रेम काय आहे हे जगाला दाखवले आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेच्या निखाऱ्यातून उठल्यासारखे जपानने स्वतःला सावरले आणि जगापुढे एक आदर्श निर्माण केला. लवकरच द जपान देश विकसित देश म्हणून ओळखू लागला. प्रचंड देश प्रेम आणि प्रचंड एकी या गोष्टींमुळे जपानने जगाच्या इतिहासात आपले नाव नव्याने कोरले आणि आपली एक नवी ओळख निर्माण केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात जपानने प्रचंड प्रगती केली.
*भूकंप आणि जपान यांचे समीकरण
जपान हा देश एका छोट्याशा बेटावर वसलेला आहे. जपान देशात दररोज कितीतरी वेळा भूकंप होतात, पण या भूकंपामुळे जपान देश कधीच खचला नाही. भूकंप वारंवार होत असल्यामुळे जपानने भूकंप प्रतिबंधात्मक घरे बांधली. कित्येक वेळा जपानचे रस्ते खचतात. पूल खचतात, पण जपान देश मात्र कधीच खचून गेला नाही. या सर्व गोष्टींवर मात करून जपानने आपली प्रगती पुढे चालूच ठेवली.
*जपानची लोकसंख्या
2024 सालची जपानची लोकसंख्या विचारात घेता महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी आहे, तेवढीच साधारणतः जपानची लोकसंख्या आहे. 2024 साली जपानची लोकसंख्या 12.36 कोटी होती. सध्या जपानची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 339 इतकी आहे.
*टोकियो ची लोकसंख्या
जपान मधील सर्वात मोठे शहर म्हणून जपानची राजधानी टोकियो या शहराकडे पाहिले जाते. टोकियो या शहराची लोकसंख्या 2024 साली 83 लाख 36 हजार 599 होती.
*जपान मधील लहान मुलांची संख्या
2024 साली जपान मधील 14 वर्षाखालील मुलांची संख्या केवळ 1.4 कोटी आहे. ही लोकसंख्या पाहता जपानसाठी खूप धोक्याची घंटा आहे.
*जपान देश नामशेष होण्याच्या मार्गावर?
जपान मधील सध्या जन्मदर पाहता जपानचा जन्मदर दरवर्षी आश्चर्यकारकरीत्या कमी कमी होत चालला आहे. हा जन्मदर असाच पुढे कमी होत गेला तर आणखी 200 वर्षांनी म्हणजे 2725 वर्षांनी जपान हा देश पृथ्वीतलावरून नामशेष होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जपानने यावर वेळीच उपाययोजना केली नाही म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग वाढवला नाही तर जपानसाठी ही बाब खूप मोठी चिंताजनक आहे.
जपान मधील तोहोकू विद्यापीठातील प्रोफेसर हिरोशी यशोदा यांनी रियल टाईम पोपुलेशन क्लॉक विकसित केले आहे या क्लॉक ने मांडलेल्या गणितानुसार जपानची लोकसंख्या सातत्याने घटत चालली आहे. या क्लबच्या म्हणण्यानुसार आणखी 200 वर्षांनी जपान पूर्णतः नामशेष होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
2024 साली सहा महिन्यात जपानमध्ये केवळ तीन लाख 50 हजार 74 मुले जन्माला आली. हा वेग खूपच कमी आहे. 2023 सालच्या तुलनेत जपान मधील मुलांचा जन्मदर तब्बल 5.7% नी घटलेला दिसून आला आहे. ही बाब जपान साठी खूप गंभीर आहे.
जपान हा देश सर्वच बाबतीत प्रगतीपथावर आहे, मात्र जपानने लोकसंख्येबाबत आजपर्यंत गांभीर्यता घेतलेली दिसत नाही.
*जपान मधील विवाह
जपानमध्ये तरुणांचे विवाह वेळेवर होत नाहीत. आणि तरुण मुले वेळेवर विवाह होण्यासाठी उत्सुकही नाहीत. ही बाब जपानच्या दृष्टीने धोक्याची घंटा झाली आहे. जपानच्या तरुणांना लवकर मुले नको आहेत. तर काहींना मुलेच नको आहेत. त्यामुळेच जपानच्या लोकसंख्येचा वेग खूपच कमी झाला आहे.
*जपान मधील वृद्धांची संख्या
सध्या जगाचा विचार करता सर्वात जास्त टक्केवारीने वृद्ध लोक जपान मध्ये राहतात. या वृद्ध लोकांचा लोकसंख्या वाढीसाठी काहीही उपयोग नाही. त्यामुळे जपानच्या भविष्यासाठी जपानच्या तरुण मुलांनी लवकर विवाह करणे आणि किमान दोन मुलांना जन्म देणे हे जपानने सक्तीचा कायदा करून आपली लोकसंख्या टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर जपानचा भविष्य अंधारात आहे.
*परदेशी नागरिकांना नागरिकत्व द्यावे लागेल
जपान या देशाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी परदेशी नागरिकांना जपानचे नागरिकत्व देणे हे जपानच्या दृष्टीने भविष्यात काळाची गरज होऊन बसणार आहे. सध्या जपानला लोकसंख्येचा मुद्दा खूपच भेडसावत आहे.
*भारताची लोकसंख्या
भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. ही बाब भारताचे क्षेत्रफळ पाहता अभिमानाची नाही. लोकसंख्येची प्रचंड वाढ ही भारताची मोठी समस्या आहे. इकडे जपानमध्ये लोकसंख्येचा वेग मंदावला असताना भारतासारख्या देशात लोकसंख्या मात्र प्रचंड आहे. भारतीय नागरिकांनी जपानला स्थलांतरित झाल्यास ते जपानच्या हिताचेच आहे.