Karnataka CM latest news-कर्नाटकात फेरबदल: शिवकुमार नवे मुख्यमंत्री

भारतात अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता असताना सुद्धा कर्नाटकात मात्र काँग्रेसने आपला झेंडा लावला. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आणि त्याचवेळी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाणार असा फार्मूला ठरला होता. या फार्मूल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असून डी के शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली जाणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना राज्यसभेचे प्रतिनिधित्व दिले जाणार असून पक्षात राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी देण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. मात्र सिद्धारामय्या यांनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचे सांगत तूर्त हा प्रस्ताव स्वीकारण्यास विनम्रतेने नकार दिला आहे.

Leave a comment