दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत असून याचा फटका केवळ भारताला बसत नसून संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्य प्राणी तसेच संपूर्ण जीवसृष्टीला बसणार आहे. येत्या पाच वर्षात पृथ्वीवरील तापमान विक्रमी वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पृथ्वीवर सध्या प्रचंड वृक्षतोड होत आहे.प्रचंड प्रमाणात नवनवीन रस्त्यांची निर्मिती होत आहे. खनिज संपत्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. शहरीकरण, नव्या इमारतींची निर्मिती आणि त्याच्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य या सर्व गोष्टींमुळे सुद्धा जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात पृथ्वीवरील तापमान विक्रमी स्वरूपात वाढणार आहे. याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात तर त्याचे परिणाम अधिक प्रमाणात दिसतील. विषुववृत्तीय प्रदेशातील लोकांना आणि जीवसृष्टीला मोठा फटका बसेल. भारत हा विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळ असून भारताला मोठा फटका बसणार आहे. सन 2026 चा विचार करता भारतात प्रचंड तापमान वाढ झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ पुढील पाच वर्षात अन्य राष्ट्रांपेक्षा भारताला मोठ्या प्रमाणात तापमान वाढीचा फटका बसणार आहे. उष्माघातामुळे अनेक लोकांचा मृत्यू होणार आहे.हे तापमान वाढ रोखण्यासाठी संपूर्ण जागतिक पातळीवर उपाययोजना केल्या नाही तर त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत.
भारत आपल्या पातळीवर प्रयत्न करू शकतो
भारताने पुढील पाच वर्षात एकाही झाडाची तोड केली नाही, नवीन रस्त्यांसाठी बांधकाम केले नाही, सिमेंटचे रस्ते बांधणे बंद केले, मोठ्या प्रमाणात खनिजांच्या शोधासाठी चाललेले उत्खनन थांबवले, वाहनांचा विनाकारण प्रवास रोखला तर काही प्रमाणात भारतीय तापमान कमी आणण्यासाठी आपण सर्व भारतीय आणि भारत सरकार प्रयत्न करू शकतो.