सध्या भारतात आयपीएल क्रिकेट स्पर्धा चालू असून वैभव सूर्यवंशी या नवोदित खेळाडूने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वैभव सूर्यवंशी केवळ पंधरा वर्षाचा युवा खेळाडू असून त्याने हैदराबाद विरुद्ध 29 चेंडू 97 धावा केल्या आहेत. या 97 धावांमध्ये त्याने 12 षटकार आणि पाच चौकार मारले आहेत. आयपीएलमध्ये एकाच स्पर्धेत सर्वात जास्त षटकार मारण्याचा क्रिस गेल याचा विक्रम ही वैभव सूर्यवंशीने मोडून काढला आहे.