Avinash Phogat defeated-अविनाश फोगाटचे स्वप्न भंगले: निवडचाचणीत उपान्त्य फेरीत पराभूत

जागतिक कीर्तीची पैलवान विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आशियाई स्पर्धेच्या कुस्ती निवड चाचणीत महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत विरुद्ध चार-सहा अशी पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. विनेश फोगाटला हा खूप मोठा धक्का मानला जातो.

या पराभवामुळे विनेशचे पुनरागमन करण्याचे आणि जपान मधील आयची नागोया येथे यंदा होणाऱ्या एशियाडमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्नही भंगले आहे .विनेशने आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावत अत्यंत आक्रमक खेळणाऱ्या निशुला हरवून उपांत्य फेरीत जागा मिळवली होती. पहिल्या सामन्यात ज्योतीला 7-1 ने नमवणाऱ्या विनेश ला निशूने कडवी टक्कर दिली. आणि 5-1 अशी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेत तिने विनेशला जवळजवळ चितपट केले होते. परंतु विनेशने स्वतःला सावरले. वजनाच्या मोजमापा दरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. तिला केवळ 50 किलो वजन गटातच खेळण्याची परवानगी दिली. विनेशने तीव्र विरोध दर्शवला आहे. आपल्या आवडीच्या 53 किलो गटात उतरवण्यापासून रोखून महासंघ आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप तिन केला. विनेशला मैदानावर शह देण्याबरोबरच मैदानाबाहेरही शह देण्याचे राजकारण भारतात होत आहे, याची खंत वाटते. विनेशला रोखण्यासाठी केवळ कुस्तीगीरच नाहीतर कुस्ती बाहेरील लोकही काम करत आहेत याचे दुर्दैव वाटते.

Leave a comment