सध्या भारतात रुपया घसरल्यामुळे पेट्रोलचे दर भडकले आहेत. याशिवाय साठेबाजी व अन्य कारणांमुळेही पेट्रोलचे दर भडकले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा कल इव्ही कारकडे वळत चालला आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती सरकारी प्रोत्साहन आणि पर्यावरण पूरक पर्याय म्हणूनही वेगळा पर्याय म्हणून ग्राहकांचा कल वाढताना दिसतो आणि ग्राहक वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेताना इंधन खर्चातील बचतीवर भर देतात. मात्र आर्थिक दृष्ट्या पाहिल्यास इव्ही खरेदी हा केवळ इंधन खर्चाचा विषय नसून दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय आहे. वाहनाची किंमत, चार्जिंगची उपलब्धता, बॅटरीचे आयुष्य, देखभाल खर्च आणि भविष्यातील पुनर्विक्री मूल्य या सर्व गोष्टींचा विचार केल्याशिवाय इव्ही फायदेशीर आहे की नाही हे ठरवू शकत नाही.
या प्रश्नांची उत्तरे मिळवा, मग इव्ही खरेदी करा
बॅटरीवर किती वर्षांची वारंटी आहे? ठराविक किलोमीटरनंतर कार्यक्षमतेत किती घट येऊ शकते? कंपनीची सेवा आणि बॅटरी बदलण्याची प्रक्रिया किती विश्वासार्ह आहे? कारण काही वर्षानंतर मोठा खर्च निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला झालेली इंधन बचत कमी पडू शकते.
इव्हीबाबत महत्त्वाचे मुद्दे
शहर आणि ग्रामीण भागातील चार्जिंग सुविधा वेगवेगळ्या असू शकतात. घरगुती कार चार्जिंग यंत्रणेचा खर्च शहरापेक्षा शक्यतो वेगळा असतो.सरकारी प्रोत्साहन आणि सबसिडी धोरणे बदलू शकतात. दीर्घकालीन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहन योग्य आहे का? तपासा. पुनर्विक्री मूल्याचाही विचार करायला हवा. फक्त इंधन खर्चाचा बचत पाहून निर्णय घेऊ नका. चार्जिंग सुविधा उपलब्ध आहेत का? ते तपासा बॅटरी वारंटी आणि आयुष्य समजून घ्या. वाहनाच्या एकूण मालकी खर्चाचे गणित करा. पुनर्विक्री मूल्याचा हे विचार करा. सर्व ग्राहकांसाठी फायदेशीर आहेच असे नाही. दररोज मोठा प्रवास करणाऱ्या व्यक्तींची अधिक बचत होऊ शकते. कारण त्यांचा इंधन खर्च तुलनेने जास्त असतो.मात्र महिन्यातून काही वेळात वापरणाऱ्या ग्राहकांची किंमत वसूल होण्यासाठी अधिक काळ लागू शकतो .
इव्ही खरेदीपूर्वी कोणत्या बाबी तपासाल?
बॅटरी चेंज, चार्जिंग सुविधा, बॅटरी वारंटी, सर्विस नेटवर्क, पुनरविक्री मूल्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.