महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी रविवारी सायंकाळी अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगातील देदीप्यमान पर्व अस्तंगत झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 2 जून 2026 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अष्टपैलू गायिका
सुमन कल्याणपुर यांचा आवाज म्हणजे साक्षात सुरांचा अभिषेक होता. त्यांच्या आवाजात एक विलक्षण आर्द्रता, माधुर्य आणि आर्तता होती.केतकीच्या बने , नाविका रे वारा वाहे रे, केशवा माधवा, आला आला ग सुगंध मातीचा यासारखी अनेक गाणी ऐकताना कधीही कंटाळा येत नाही.
पद्मभूषण पुरस्काराने गौरव
सुमन कल्याणपूर यांनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मध्यप्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारने 2023 साली सुमनताईंना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महंमद रफी यांच्यासोबत गायलेल्या मनमोहन मन मे हो तुम्ही या गीतासाठी संगीत जगतातील अत्यंत मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तो पुरस्कार म्हणजे तानसेन पुरस्कार होय.
सुमंतताईनी जिथे सागरा धरणी मिळते, घाल पिंगा वाऱ्या, निंबोणीच्या झाडामागे, कशी गवळण राधा बावरली, केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर, आकाश पांघरूनी, केशवा माधवा अशी कितीतरी मराठी गाणी त्यांच्या मधुर आवाजाने लोकप्रिय केली आहेत.
सुमनताई यांची अनेक हिंदी गाणी सुद्धा खूप गाजली आहेत. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, तुमने पुकारा और हम चले आये, नाना करते प्यार तुमसे, मेरा प्यार भी तू है अशी कितीतरी हिंदी गाणी त्यांच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या कानात गुंजत आहेत.