कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दूध संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या गोकुळ दूध संस्थेची निवडणूक लागली आहे. गेले दोन महिने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाने गोकुळच्या निवडणुकीला चांगलाच रंग आला आहे. गोकुळ निवडणुकीची मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त करून काही काळासाठी प्रशासकीय मंडळ आले होते;पण पुन्हा आता निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत दूध संस्थांच्या ठरावावरून चांगलाच रंग चढला आहे. मतदार यादीतून सुमारे 441 अवसायानातील संस्था अपात्र ठरलेल्या आहेत.सुमारे 4199 संस्थांना ठराव मसुदे पाठवण्यात आले आहेत.
मतदार यादीतून वगळलेल्या संस्था
गोकुळच्या मतदार यादीतून सर्वात जास्त संख्येने वगळलेल्या दूध संस्था या राधानगरी तालुक्यात असून तो आकडा 77 असा आहे. करवीर तालुक्यातील 72, कागल तालुक्यातील 71, भुदरगड तालुक्यातील 52, गडहिंग्लज तालुक्यातील 50, पन्हाळा तालुक्यातील 35, शाहूवाडी तालुक्यातील 22, आजरा तालुक्यातील 17 असा हा आकडा आहे. अवसायानातील वगळलेल्या संस्थांमध्ये सर्वात जास्त आकडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून तो 255 आहे. तर त्या खालोखाल काँग्रेस सह विरोधी आघाडीच्या एकूण 201 संस्था अपात्र ठरल्या आहेत.
शिंदे सेनेच्या 175 संस्था अपात्र ठरलेल्या आहेत.