इस्रायलच्या लेबनाॅनवरील हल्ल्याने युद्धविराम धोक्यात आला आहे. इराण- अमेरिका यांच्यात युद्ध विरामासाठी गेले काही दिवस चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत; पण लेबनॉनमधील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबतची चर्चा स्थगित केल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी जाहीर केले आहे. असे वृत्त सीएनएन या अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. होर्मुझ खाडीतील नाकेबंदीमुळे संपूर्ण जगाला झळ बसत आहे. पेट्रोल- डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. इराण-अमेरिका युद्ध कायमस्वरूपी थांबावं ही जगाची इच्छा आहे; परंतु आजतागायत त्यावर कायमचा तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे आडमुठेपणाचे धोरण आणि इस्रायलचा हेकेखोरपणा यामुळे युद्ध पूर्णतः थांबण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तीव्र वाढ
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पूर्णतः थांबल्याशिवाय कच्च्या केल्याचे भाव कमी येणार नाहीत. अमेरिकेसोबत चर्चा स्थगित केल्याने जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली असून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तीव्र वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील प्रमुख निर्देशांक ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 6% ने वाढून 97.02 डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिका इराण युद्ध बंदी करार होण्याची शक्यता असल्याने मे मध्ये ब्रेंट क्रूडच्या किमतीत 19 टक्क्यांनी घसरण झाली होती.तथापि सध्याची किंमत अजूनही पाच एप्रिलच्या 114 डॉलर प्रतिबॅरेल या उच्चांकापेक्षा कमी आहे. ती युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा 25% जास्त आहे . त्यामुळे जगातील अनेक देशात प्रचंड महागाई वाढलेली आहे.सर्वसामान्य माणसांचे प्रचंड हाल होत आहेत.