Delhi hotel fire latest news-दिल्लीतील हॉटेलला आग : 21 जणांचा होरपळून मृत्यू

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौजी राणे येथील प्लरिश स्टे बी अँड बी हॉटेलमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये अकरा परदेशी नागरिकांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात हॉटेल परवानगीपेक्षा जवळपास चौपट क्षमतेने चालवले जात असल्याचे त्याला अग्नी सुरक्षा परवानगी नसल्याचे व इमारतीवर बेकायदा अतिरिक्त मजले बांधण्यात आल्याचे लक्षात आले आहे .त्यामुळे या हॉटेलवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी होत आहे.

सहा खोल्यांची परवानगी. प्रत्यक्षात बांधल्या 24 खोल्या.

2010 मध्ये राष्ट्रकुल खेळांदरम्यान सरकारच्या बेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत या हॉटेलला परवानगी नाकारण्यात आली होती. प्लरिश बी अँड बी हॉटेलला सहा खोल्या बांधण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात 24 खोल्या बांधण्यात आल्याचे दिसून आले. या हॉटेल मालकाच्या आणि व्यवस्थापकांच्या गलतान कारभारामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे.त्यामुळे या हॉटेलवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

Leave a comment