पश्चिम आशियात अजूनही शांतता नाही. युद्धबंदीला पुन्हा पुन्हा हरताळ फासण्याचे काम होत आहे. इराणने कुवेतच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही प्रती हल्ला केला. यामुळे युद्धबंदीच्या चर्चेला धक्का बसला आहे. इराणने युद्धबंदीच्या मध्यस्थांशी संपर्क थांबवला आहे. लेबनॉनमधील संघर्ष थांबवल्याशिवाय पुढील चर्चा होणार नाहीत अशी भूमिका तेहराने घेतली आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले आहे की चर्चा थांबलेली नाही. संवाद सुरू आहे.
इराणच्या हल्ल्यात कुवेत विमानतळाचे मोठे नुकसान झाले असून एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे .हल्ल्यात अनेक जखमी झाले असून आत्तापर्यंत 63 जखमींना विविध रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी सकाळी कुवेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळावर इराणाने ड्रोन हल्ला केला. विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलला लक्ष करण्यात आले. हल्ल्याचा जोर इतका होता की टर्मिनल इमारतीचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व हालचाली थांबवण्यात आल्या.
ट्रम्प- नेतान्याहू मतभेद उघड
अमेरिकेतील जनतेचा रोश दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रम्प यांना हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबवायचे आहे. हे आता उघड झाले आहे.म्हणूनच ट्रम्प यांनी इस्रायलचे अध्यक्ष नेतान्याहू यांच्यावर लेबनॉनवरील थांबवण्यासाठी दबाव आणला होता; पण तो दबाव नेतान्याहूने धुडकावून लावला. याचा अर्थ स्पष्ट होतो की ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समीकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.