अमेरिका फर्स्ट या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतावर वारंवार टॅरिफ लावण्याचे काम अमेरिकेने केले आहे. तरीसुद्धा भारताचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना माय फ्रेंड असे म्हणतात, ही बाब तर दुर्दैवाची आहे. आता पुन्हा एकदा भारतासह 60 देशांवर टॅरिफचा फटका पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त साडेबारा टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांचा आहे. कापड, इलेक्ट्रॉनिक्स, खाण क्षेत्रातील निर्यातीला बसणार आहे फटका!
भारत, चीन सह 54 देशावर साडेबारा टक्के शुल्क
भारत, चीनसह 54 देशांमध्ये वेठबिगारीच्या मालावर कोणताही कायदा नाही आणि वेटबिगारी रोखण्यासाठी कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे हा अतिरिक्त शुल्क आकारला जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. या गोष्टीचा अभियांत्रिकी उत्पादने, रसायने, वस्त्रोद्योग, रेडिमेड कपडे, चामड्याचे उत्पादने, कृषी प्रक्रिया, उद्योग, औद्योगिक घटक, वाहने सुटे भाग यावर विपरीत परिणाम होणार आहे.