Rahul Gandhi Nicobar visit-पर्यावरणाच्या रक्षणासाठी राहूल गांधी यांची निकोबारच्या समुद्रात उडी

भारताच्या विशाल संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी निकोबारच्या भेटी अंतर्गत शुक्रवारी सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आणि जनतेला सल्ला दिला की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही प्लास्टिक वापरू नका. जैवविविधता टिकवून ठेवा. असा सल्ला दिला आहे. याशिवाय निकोबार च्या समुद्रात तळाशी स्कुबा डायव्हिंग करून समुद्र तळाचे निरीक्षण केले. प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे स्वागत सोशल मीडियावर सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात होत आहे.

जागतिक स्तरावर बहुतांश देशांमध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात विनाश होत आहे. हा विनाश करण्यामध्ये भारत देश आणि भारतातील कंपन्या यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आणि प्रत्येक प्रदेशातील राज्य सरकारने योग्य भूमिका घेणे आवश्यक आहे. केरळ एक सुंदर राज्य आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि पर्यावरण पूरक असे हे निसर्गरम्य राज्य आहे.केरळ सारखाच संपूर्ण भारत देश होणे गरजेचे आहे. संपूर्ण जगाला आदर्श देण्यासाठी भारताने पर्यावरणासाठी खास उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. सरकारबरोबर जनतेने अशा उपक्रमात सामील व्हावे.

Leave a comment