Cockroach Janata Party Delhi rally-कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नियोजनाप्रमाणे शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी उपस्थिती दाखवून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.कॉक्रोच जनता पार्टी ही विद्यार्थ्यांच्या असंतोषाची चळवळ आहे, असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणात म्हटले.

हजारो तरुणांसह सोनम वांगचुक वांगचुक यांची उपस्थिती

दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो तरुणांबरोबर सोनम वांगचुक यांनीही आपली उपस्थिती दाखवली. परीक्षा व भरती प्रक्रियेतील कथीत गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शनिवारी जंतरमंतर येथे एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो विद्यार्थी, तरुण, पालक सहभागी झाले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी सात दिवसात राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कारवाई करण्याऐवजी सोशल मीडियातील पोस्ट हटवण्यात सरकार व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थी विकले गेलेले नाहीत. सीजेपी ही विद्यार्थ्यांच्या असंतोषाची चळवळ असून हिंदू-मुस्लिम राजकारणाऐवजी रोजगार व शिक्षणाच्या प्रश्नावर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली.

Leave a comment