Radhanagari monkey attack-राधानगरी तालुक्यात पिसाळलेल्या वानरांचा, कोल्ह्यांचा धुमाकूळ. 80 हून अधिक लोक जखमी

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात सोळांकूर ,सरवडे ,मालवे ,बोरवडे परिसरात वानराने आणि कोल्ह्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. सोळांकूर गावात पिसाळलेल्या वानराने 70 हून अधिक लोकांचा चावा घेतला आणि गंभीर जखमी केले. सरवडे, मालवे,बोरवडे परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्यांनी धुमाकूळ घातला आहे आणि आठ ते दहा लोकांना त्यांनी गंभीर जखमी केले आहे. पिसाळलेल्या वानरांपासून,कुत्र्यांपासून , कोल्ह्यांपासून रेबीज हा भयानक न बरा होणारा आजार होतो . काही दिवसातच ज्यांना पिसाळलेले वानर, कोल्हा चावले आहे त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच नागरिकांनी रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेणे आवश्यक आहे.

Leave a comment