Kolhapur crime news-कोल्हापुरात घरफोडीचे प्रमाण वाढले.दागिने, रोकड लंपास करून चोरट्यांनी बंगल्यास आग लावली

कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील ही घटना आहे. येथील इरा गार्डन रहिवासी संकुलातील शिवाजी पाटील मूळ गाव आरळे तालुका करवीर यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सहा तोळे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर बंगल्यात चार ठिकाणी कपडे, कागदपत्रे, फर्निचरला आग लावून चोरट्यांनी पळ काढला. बंगल्यात चोरी करून आग लावण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.त्यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांना आश्चर्य वाटले आहे.सगळ्यात महत्त्वाचे आणि धोकादायक म्हणजे कोल्हापूर शहरात चोरांचा अक्षरश: सुळसुळाट चालू आहे. पोलिसांनी चोरी प्रतिबंधक पथक स्थापन करून चोरांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने संपूर्ण शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या शेजारी चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधून चोरांना पकडण्यास मदत करावी ही सुद्धा अपेक्षा आहे.

Leave a comment