फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. या खेळाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे फिफा विश्वचषक (FIFA World Cup).12 जून 2026 मध्ये सुरू होणारा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण यावेळी प्रथमच 48 देश सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक रोमांचक विश्वचषक म्हणून ओळखला जाईल.
विश्वचषक कधी आणि कुठे होणार? When and where will the World Cup be held?
फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा 11 जून 2026 ते 19 जुलै 2026 या कालावधीत खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार काही सामने 12 जूनपासून पाहायला मिळतील.
या स्पर्धेचे आयोजन युनायटेड स्टेट्स, कॅनडा, मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे करणार आहेत:
विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच तीन देश एकत्र येऊन या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत.
किती देश सहभागी होणार How many countries will participate?
यापूर्वीच्या विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. मात्र 12 जून 2026 पासून ही संख्या वाढवून 48 संघ करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक देशांना जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च मंचावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
पात्र ठरलेले काही प्रमुख देश
सध्या अनेक देशांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. त्यापैकी काही प्रमुख देश पुढीलप्रमाणे आहेत: अर्जेंटिना , ब्राझील, जपान, इराण,
दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उझबेकिस्तान, जॉर्डन, एक इक्वेडोर हे प्रमुख देश आहेत.
याशिवाय जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल, नेदरलँड्स यांसारखे बलाढ्य संघही पात्रता फेऱ्यांमधून विश्वचषकात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मिळवले आहे.
स्पर्धेचे स्वरूप कसे असेल? What is the format of the competition?
गट फेरी (Group Stage)
48 संघांचे 12 गट बनवले जातील.
प्रत्येक गटात 4 संघ असतील.
प्रत्येक संघाला गट फेरीत 3 सामने खेळावे लागतील.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत जातील.
त्याशिवाय सर्व गटांतील सर्वोत्तम 8 तिसऱ्या क्रमांकाचे संघही पुढील फेरीत प्रवेश मिळवतील.
बाद फेरी (Knockout Stage)
यानंतर स्पर्धा पुढील टप्प्यांमध्ये खेळवली जाईल:
32 राउंड ,16 राउंड, उपउपांत्य फेरी,उपांत्य फेरी,फायनल मॅच
अशा पद्धतीने अखेरीस विश्वविजेता संघ निश्चित केला जाईल.
एकूण किती सामने?
2026 च्या विश्वचषकात एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. ही संख्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. त्यामुळे चाहत्यांना अधिक सामने आणि अधिक रोमांच अनुभवायला मिळणार आहे.
विश्वचषकातील प्रमुख दावेदार
यंदाच्या विश्वचषकात खालील संघांवर विशेष लक्ष असेल:
अर्जेंटिना – विद्यमान विश्वविजेता.
ब्राझील – सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेता.
फ्रान्स – मजबूत आणि संतुलित संघ.
जर्मनी – मोठ्या स्पर्धांतील दमदार कामगिरीसाठी प्रसिद्ध.
स्पेन – तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट संघ.
इंग्लंड – युवा आणि आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा
पोर्तुगाल– युरोपमधील बलाढ्य संघ.
नेदरलँड– सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ.
विश्वचषक 2026 ची वैशिष्ट्ये
प्रथमच 48 संघांचा सहभाग.
तीन देशांचे संयुक्त आयोजन.
विक्रमी 104 सामने.
नवोदित देशांना जागतिक स्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी.
अधिक शहरांमध्ये सामने आणि अधिक प्रेक्षकांचा सहभाग.
फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक.