Ambabai Temple Kolhapur-कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस! भक्ती की प्रदर्शन?

21व्या शतकात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा, परंपरा आणि रूढी रुजत आहेत. अधिक मासाची रूढही अशीच आहे. ती अलीकडेच खूप खूप फोफावलेली आहे. लोकांकडे पैसा झाला की तो कुठे खर्च करायचा असा प्रश्न पडतो. सामाजिक कार्य करण्यासाठी जितके करावे तितके थोडेच असते. पण श्रद्धा नावाची जी अंधश्रद्धा आहे त्यापुढे काहीही चालत नाही. गोव्यातील एका भक्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या कळसाला दीड किलो सोन्याच्या कळसाची भेट दिली आहे. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर ही भेट दिलेली आहे. या कळशाची किंमत चालू भावाप्रमाणे आहेत कोटी रुपये आहे.

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख देवता मानली जाते.तर अखंड भारतातील 51 पिठांपैकी एक असे मानले जाते.गेल्या पाचसहा वर्षात अंबाबाईच्या दर्शनाला येण्याऱ्या भक्तांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.

महात्मा फुले यांनी सुरुवातीला शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळी काम केली आणि शाळेसाठी पैसा उभारला. कंत्राट घेतले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आणि लोकांच्या मदतीतून शाळा चालू केल्या. दुष्काळाच्या काळात दररोज दोन हजार लोकांना जेवण देण्याचे काम सलग दीड वर्ष त्यांनी केले. हे खरे धार्मिक कार्य आहे. मंदिराच्या कळसाला सोन्याचा कळस देणे कितपत योग्य आहे? आपला समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने वाहत चाललेला आहे असेच वाटते.

दान करण्याची पद्धत बदलणे आवश्यक

कोणतेही धार्मिक कार्य म्हटले की माणूस कोणताही विचार न करता दान करतो; पण आजच्या सरकारी शाळा पाहिल्या तर त्यांची दूर्दशा पहावत नाही . गोरगरीब विद्यार्थी असे आहेत की ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील; पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेत नाहीत आणि स्वावलंबी बनू शकत नाहीत. अशा ठिकाणी दानशूर व्यक्तींनी जर दान केले तर ते अधिक संयुक्तिक होईल असे वाटते.

Leave a comment