Mumbai live concert incident-मुंबईत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नशेचा बळी: तरुणाईची नशा महाग पडली

मुंबई जवळील गोरेगावनंतर आता वरळीतील कॉन्सर्टमध्ये नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एका तरुणीची प्रकृती बिघडलेली असून मृत्यूचे कारण ड्रग्स की मद्य सेवन हे स्पष्ट झाले नाही. चार हजार रुपयांचे तिकीट घेऊन ही तरुणाई आली होती. तरुणाईला ही लागलेली कीड आहे. भारतात अशा अनेक ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात आणि तरुणाई मध्यधुंद अवस्थेत, ड्रग्ज सेवन करून धुंदीत नाचत असतात.ही एक तरुणाईला लागलेली कीड आहे. तरुणाईला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा आणि प्रबोधन करणे गरजेचे आहे.

वृषभ महेंद्र गांगुर्डे हा 28 वर्षांचा तरुण मृत झाला असून त्याने अति मध्य प्राशन केले होते .मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ताडदेव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व मुद्द्यांवर तपास सुरू केला आहे. वृषभच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण अतिमध्य पान ,गर्दीमुळे झालेला त्रास,ड्रग्स किंवा अन्य कोणता घटक कारणीभूत आहे का, याचा तपास सुरू आहे.पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करून तपास सुरू केले आहेत. प्राथमिक चौकशीत अमली पदार्थांच्या सेवनाचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. सर्व बाजूने तपास सुरू आहे.

पुण्याजवळ खासगी बंगल्यात रेव्ह पार्टी

शंभूराजांचे स्मृतिस्थळ आणि पवित्र इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या श्रीक्षेत्र तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात शनिवारपासून सुरू असलेल्या प्रोजेक्ट एक्स पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकली. 156 तरुण-तरुणींची तसेच आयोजकांची चौकशी करण्यात आली. मद्य, गांजा, हुक्का, फ्लेव्हर्स आणि जवळपास 85 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. अशा गोष्टी पोलिसांना अगोदरच का माहीत होत नाहीत? धाडीसत्र का सुरू होत नाही? महाराष्ट्रात असे प्रकार कुठेही होऊ नयेत. पोलिसांच्या संगणमतीने सुद्धा असे प्रकार होऊ नयेत याची काळजी पोलिसांनी , प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. नाही तर तरुणाई पूर्णपणे बिघडत जाईल.

Leave a comment