2026 च्या आयपीएल मध्ये सर्वात फुल फॉर्ममध्ये असलेल्या वैभव सूर्यवंशीची भारतीय टी ट्वेंटी संघात निवड झालेली आहे. ही गोष्ट वैभवसाठी भूषणावह आहे. 2026 च्या आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा काढून ऑरेंज कॅप पटकावलेली आहे. भारतीय टी ट्वेंटी संघात वैभवने स्थान पटकावल्यामुळे सचिन तेंडुलकरचा 38 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम वैभवने मोडून काढला आहे. सर्वात लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकर होता. त्याच्या नावावर हा विक्रम अडतीस वर्षे होता. आता तो पंधरा वर्षाच्या वैभवने मोडीत काढला असून सर्वात लहान वयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना खेळणारा तो खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे.