मध्यप्रदेशातील तीन राज्यसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी काँग्रेसला निवडणूक आयोगाने जबरदस्त धक्का दिला आहे. पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा नामनिर्देशन अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहे. नटराजन यांनी शपथपत्रात माहिती लपवल्याची भाजपकडून तक्रार केली होती. तक्रार केल्याबरोबर खात्री न करता लगेच निवडणूक आयोगाने मीनाक्षी राज यांनी यांचा अर्ज बाद केला. तेलंगणामधील एका प्रकरणाची माहिती नटराजन यांनी जाणून बुजून लपवली आहे. ती शपथपत्रात नमूद केली नाही.असा भाजपने आक्षेप घेतला होता. यावर काँग्रेसने सडकून टीका केली असून नटराजन यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही केवळ न्यायालयाकडून नोटीस मिळाली आहे. निवडणूक नियमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणे आवश्यक असते. केवळ नोटीस मिळाल्यावर नाही. त्यामुळे अर्ज बाद करण्यात तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे असा दावा काँग्रेसने केला आहे.