भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केलेले आहे. स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास सोसला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ते अग्रभागी होते. 1946 पासून ते भारताचे पंतप्रधान होते.15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी भारताचा तिरंगा फडकवून भारताच्या पहिल्या पंतप्रधानाची भूमिका बजावली. तेथून पुढे सलग 1964 पर्यंत त्यानी पंतप्रधान म्हणून उत्तम भूमिका बजावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दीडशे वर्षाहून अधिक पारतंत्र्यात असलेल्या देशाला सुरळीत आणण्यासाठी त्यांनी अनेक विकासात्मक कामे हाती घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेक मोठमोठी धरणे बांधून घेतली. अलिप्त राष्ट्र संघटना चळवळ उभा केली.आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काही वर्षातच त्यानी आपला धबधबा निर्माण केला. त्यांच्या भारताच्या नवनिर्मितीसाठी अतुलनीय योगदानाची कुणाशीही तुलना करता येणार नाही, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले आहे. बुधवार दिनांक 11 जून 2026 रोजी विद्यमान मोदी सरकारची बारा वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला असे विकत घेतलेल्या मीडियामध्ये संपूर्ण भारतभर डंका वाजू लागलेला आहे. पण पंडित नेहरूंच्या कर्तृत्वाची तुलना मोदींशी होऊच शकत नाही. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवणे, कोणत्याही विकास कामासाठी ठोस भूमिका न घेणे, 65 हजार हून अधिक शाळा बंद करणे गेल्या बारा वर्षात केवळ दोनच धरणे बांधली आहे तीही अजून अपूर्ण आहेत. त्य फक्त मंदिर बांधण्याचे आणि लोकांना धार्मिकतेकडे वळवण्याचं काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल अशी कामे केलीत .रस्ते ,पूल बांधले, त्यांचा दर्जा उत्तम नाही आणि एक पूल कोसळले गुजरात मधील सुद्धा फुल कोसळले .त्यामध्ये प्रचंड पैसा मिळवला आणि निवडणुकीला ओतला. ईव्हीएमचा दुरूपयोग करून वाईट मार्गाने सत्तेवर आले. अशा प्रकारची लोकशाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात नव्हती. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू एका कार्यक्रमाला जात असताना एका वृद्ध स्त्रीने ‘माझ्यासाठी तुम्ही काय केले’असा प्रश्न विचारला. त्यावेळी जवाहरलाल नेहरू तात्काळ उतरले , देशाच्या पंतप्रधानाची कॉलर एक सामान्य नागरिक पकडू शकतो हा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे, असे पंडित नेहरूंनी त्यावेळी उत्तर दिले . अशा पंडित नेहरूंची तुलना करणे कुणाशीच शकत नाही.केवळ स्टंटबाजी करणे, खोटा इतिहास दाखवणे, खोटं बोलणे यामध्ये मात्र त्यांनी विक्रम केलेला आहे .भारताच्या संपूर्ण इतिहासात इतक्या वाईट पद्धतीने काम करणारा ईडी ,सीबीआय, न्यायालयीन व्यवस्था कमकुवत करून आपल्या ताब्यात ठेवून लोकशाहीचा गळा घटणारा पंतप्रधान अशी नरेंद्र मोदींची खरी ओळख आहे. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू असो की इंदिरा गांधी असो यांची तुलना त्यांच्याशी होत नाही एवढेच नव्हे तर सात-आठ महिने जे पंतप्रधान झाले त्यांच्याशीही यांची तुलना होऊ शकत नाही. इतके वाईट कार्य गेल्या बारा वर्षात झालेले आहे.