Kolhapur Shaktipeeth protest-कोल्हापूरकरांचा शक्तीपीठला प्रचंड विरोध: विराट मोर्चा

कोल्हापुरी माणूस म्हटले की लढवय्या बाणा हा त्यांचा हुकमी गुण आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरात टोल वसुली चालू होती. कोल्हापूरकरांनी मोर्चा काढून आपला लढवय्यपणा सातत्य ठेवून टोल हाकलून लावला. आता शक्तिपीठ हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसू पाहत आहे. त्याला कोल्हापूरकरांनी प्रचंड विरोध केला आहे.रक्ताचा सडा पडला तरी चालेल पण जमीन देणार नाही, अशी जिद्द शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी,कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित पोवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शक्तीपीठ कुणासाठी..?

शक्तीपीठ कुणासाठी? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.ठेकेदार पोचण्यासाठी की अन्य कोणत्या कारणासाठी? पर्यायी मार्ग असताना या शक्तिपीठाचा आटापिटा कशासाठी? असा सवाल शेतकरी संघटनातून उमटत आहे.सरकारला केवळ ठेकेदार पोसायचे आहेत का? शेतकऱ्यांच्या मानगोटीवर सुरी फिरवायची आहे का ?अशा तीव्र भावना शेतकरी वर्गातून उमटत आहेत. काहीही झाले तरी कोल्हापुरातून शक्तीपीठ पुढे सरकणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाय सुद्धा ठेवला जाऊ दिला जाणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

Leave a comment