21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो.भारताने 2014 साली संयुक्त राष्ट्र संघाकडे योग दिन साजरा करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला आणि संयुक्त राष्ट्र संघाने त्या प्रस्तावाची लगेच अंमलबजावणी करून 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होऊ लागला. योगाशास्त्राचा उगम हा भारतातच झालेला असून त्याचा प्रसार आणि प्रचार भारतातूनच होत आहे. भारतभूमीला योगाची जननी असे मानले जाते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी योग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच संपूर्ण जगामध्ये योग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त संपूर्ण जगात वातावरण व्हावे ही अपेक्षा असते.
योग म्हणजे काय?
योग हा एक अभ्यास असून विशिष्ट लयात, तालासुरात शारीरिक हालचाली करणे,वेगवेगळ्या प्रकारची आसने सूत्रबद्धरीत्या करणे, प्राणायाम करणे, ध्यानधारणा करणे म्हणजेच योग होय. योगाची ही विविध अंगे आहेत. या विविध अंगांमध्ये विविध प्रकार पडतात. संपूर्ण योगाभ्यास हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.
सूर्यनमस्कार
आपल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीत संपूर्ण योग करणे शक्य नसले तरी अगदी कमी वेळात उत्तम प्रकारे योग करण्यासाठी अनेकजण सूर्यनमस्कार निवडतात.
सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार असून तो सर्वांगसुंदर योग प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या विविध भागाची हालचाल उत्तम प्रकारे होते. शरीर सुडौल बनते. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण राहते. आत्मविश्वास वाढतो. शारीरिक सुदृढता वाढते. त्यामुळे प्रत्येक माणसाने किमान 12 ते 24 सूर्यनमस्कार दररोज सकाळी किंवा संध्याकाळी उपाशीपोटी करणे आवश्यक आहे.
काही महत्त्वाची आसने
दीर्घ श्वसन, ताडासन,वृक्षासन, वज्रासन, ध्यान इत्यादी काही महत्त्वाची योगसाधना आणि योगासने आहेत. ही योगासने कोणत्याही वयातील व्यक्तीने करण्यास योग्य आहेत.
योगा आणि हॅबिल्डची उत्तुंग भरारी
कार्पोरेट जगताला योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्याची नवी वाट दाखवणारे सौरभ बोथरा यांनी आयआयटी वाराणसी येथून इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन व्यवसाय न करता हॅबिल्ड ही योगाची संस्था स्थापन करून ऑनलाइन योगाचे मार्गदर्शन सुरू केले . ही योगाची संस्था इतकी प्रचंड प्रमाणात देशात आणि देशाबाहेरही 130 हून अधिक देशात पसरलेली असून हॅबिल्ड योगा हा जगातील सर्वात लोकप्रिय योगा झाला आहे. वेळ मिळेल तेव्हा हॅबिल्डच्या माध्यमातून लाखो नव्हे तर करोडो लोक दररोज योगाचा अभ्यास करतात . नियमित सातत्यपूर्ण सराव करतात. 2026 साली जवळजवळ दीड करोड लोक हॅबिल्डद्वारे एका आठवड्यात योगाभ्यास शिकत आहेत. यावरून योगाच्या क्षेत्रात हॅबिल्डने मारलेली उत्तुंग भरारी ही उल्लेखनीय अशीच आहे हे लक्षात येते.