इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदी संदर्भात चर्चा चालू असतानाच इस्रायलने लेबेनॉनवर हल्ले केले.या पार्श्वभूमीवर इराणने चर्चा स्थगित केल्याची घोषणा केली. तोपर्यंत चर्चा होणार नाही जोपर्यंत इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले.त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इराण- अमेरिका चर्चेला पुन्हा स्थगिती मिळाल्याने संपूर्ण जगाची निराशा झाली आहे.
स्वित्झर्लंड येथील चर्चा स्थगित
इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध बंदीच्या कराराची चर्चा 19 जून पासून चालू होती. ही चर्चा स्वित्झर्लंड येथे चालू होती. चर्चा चालू असतानाच इस्रायलने लेबेनॉनवर तुफान हल्ले केल्यामुळे शुक्रवारी इराणचे प्रतिनिधी स्वित्झर्लंडला गेलेच नाहीत.लेबनॉन विरोधातील इस्रायल युद्ध थांबवत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही अशी इराणने भूमिका घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडेव्हान्स यांचा दौरा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. या चर्चांचा उद्देश युद्धानंतरचा अंतिम शांतता करार आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर मर्यादा घालणे हा होता; पण लेबनॉनवरील हल्ल्याने संपूर्ण चर्चेलाच पूर्णविराम मिळाला आहे.