FIFA World Cup 2026-एम्बापेचा नवा विश्वविक्रम; फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये इतिहास रचला

फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आता चांगलीच रंगत तयार झाली आहे. फ्रान्सचा स्टार खेळाडू एम्बापे याने सलग दोन शानदार गोल करून या गोलच्या जोरावर फ्रान्सने स्वीडनचा 3 -0 असा धुव्वा उडवला. या धमाकेदार विजयासह फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत धडक मारली. आता फ्रान्सचा सामना पॅराग्वे विरुद्ध होईल.

एम्बापेचा नवा विक्रम

आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करत एम्बापेने 45 व्या मिनिटाला अप्रतिम क्रॉस ओव्हर किक द्वारे फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत त्याने विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आत्तापर्यंत दहा गोल करण्याचा विक्रम कोणाच्याही नावावर नाही. तो विक्रम एम्बापेने केला आहे. त्याने ब्राझीलचा दिग्गज खेळाडू लिओनिडास आणि रोनाल्डो यांच्या प्रत्येकी आठ गोलच्या विश्वविक्रमाला मागे टाकले आहे. 85 व्या मिनिटाला त्याला विश्रांती देण्यासाठी मैदानाबाहेर बोलावण्यात आले होते.

आत्तापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मेस्सी आघाडीवर आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत एकूण 19 गोल केले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ एम्बापे अठरा गोल करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धा अजून बाकी आहे. मेस्सीची ही शेवटची स्पर्धा असेल. एम्बापे मात्र अजून आणखी एक दोन स्पर्धा खेळू शकतो. आता गोल्डन शूजचा दावेदार म्हणून मेस्सी आणि एम्बापे यांच्याकडे पाहिले जाते.

Leave a comment