भारतातील पारंपरिक आहारामध्ये शेवग्याला (Moringo) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेवगा हे महत्त्वाचे अन्न आहे. त्याचबरोबर शेवगा आर्थिक उत्पन्न देणारा महत्त्वाचा घटक आहे. शेवग्याच्या भाजीपासून ते फळापर्यंत अनेक उपयोग आणि फायदे आहेत. म्हणूनच शेवग्याला जीवनदायी वृक्ष असे म्हटले आहे. शेवग्याच्या शेंगा, पाणी, फुले, साल आणि मुळे यांचे विविध प्रकारे उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्येही शेवग्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जगभरात शेवग्याची पावडर, कॅप्सूल ते विविध आरोग्यपूरक उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
शेवग्यामध्ये असणारी पोषक तत्त्वे Nutrients found in drumstick

शेवग्याच्या भाजीमध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी ,विटामिन ई ,कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, प्रथिने , फायबर, अँटीऑक्सिडेंट्स इत्यादी महत्त्वाचे घटक असल्यामुळेच शेवग्याला सुपरफुड (Super food )म्हणून ओळखले जाते.
शेवग्याचे आरोग्यदायी फायदे Benefits of Drumsticks
शेवग्यामध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेवग्याचे पोषण मूल्य खूपच महत्त्वाचे आहे. शेवग्याच्या या गुणकारी गुणधर्मामुळे आरोग्यशास्त्रात शेवग्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. शेवग्याच्या विविध फायदे आपण पाहू.
1 मासिक पाळी संदर्भातील सर्व आजारावर गुणकारी.
शेवग्याच्या भाजीचा उपयोग आणि शेंगांचा उपयोग मासिक पाळीतील सर्व प्रकारच्या तक्रारी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध स्त्रीरोगतज्ज्ञ मासिक पाळीच्या तक्रारी पूर्णतः कमी होण्यासाठी स्त्रियांना शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा खाण्याचा सल्ला देतात. इतके शेवग्याच्या भाजीचे महत्त्व आहे.
2 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
शेवग्याच्या भाजीमध्ये विटामिन सी आणि एंटिऑक्सिडेंटचे घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवग्याची भाजी खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोणत्याही आजाराला पळवून लावण्यासाठी शेवग्याची भाजी गुणकारी आहे.
3 हृदयविकारावर गुणकारी.
शेवग्याच्या भाजीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स घटक मोठ्या प्रमाणात आणि मुबलक असल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण राखण्यास हे घटक उपयुक्त ठरतात. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या लोकांनी विशेषतः कोलेस्टेरॉल असणाऱ्या लोकांनी शेवग्याची भाजी नियमित खावी असा वैद्य सल्ला देतात.
4 हाडे मजबूत होतात.
शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिजे असल्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते आणि हाडे मजबूत आणि कणखर बनतात.
5 रक्तक्षय कमी होतो.
शेवग्याच्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते आणि रक्तक्षय असणाऱ्या लोकांसाठी ही भाजी गुणकारी ठरते.
6 मधुमेह नियंत्रणास मदत.
काही संशोधनानुसार शेवग्याच्या पानातील घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मात्र औषधांचा पर्याय म्हणून वापरू नये. शेवग्याची भाजी नियमित खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.