ताजमहाल/ Tajmahal agra

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात यमुना नदीच्या काठी उभारलेली सुंदर कलाकृती म्हणजे ताजमहाल होय. जगातील सात आश्चर्यांमध्ये गणले गेलेले भारतातील एकमेव वास्तुशिल्प म्हणजे ताजमहाल होय. संपूर्ण संगमरवरी दगडात उभारलेला ताजमहाल चांदण्या रात्री अधिक खुलून दिसतो. या ताजमहालाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.——-

ताजमहाल पाहायला कसे जाल ? How to go to see Tajmahal?

•उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात ताजमहाल आहे. आग्र्याहून ताजमहाल केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने ताजमहाल पाहायला जाता येते.

* उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद‌हून ताजमहाल 48 किलोमीटर अंतरावर आहे.

* मथुरेतील वृंदावन पाहून ताजमहाल पाहायला जाता येते. मथुरा ते ताजमहाल 63 किलोमीटर अंतर आहे.

* दिल्ली ते ताजमहाल अंतर 260 किलोमीटर आहे.

ताजमहालाचे वैशिष्ट्य:

उत्तर प्रदेशातील आग्रा शहराजवळच 5 किलोमीटर अंतरावर यमुना नदीच्या काही ताजमहाल ही संगमरवरी दगडातील देखणी इमारत डौलाने उभी आहे.
तत्कालीन दिल्लीचा बादशाह शाहजहान याची बेगम मुमताज महल हिचे आकस्मिक निधन झाले. तिच्या आठवणी प्रीत्यर्थ बांधलेला हा ताजमहाल जगप्रसिद्ध असून हा ताजमहाल पाहण्यासाठी देशोदे‌शीचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, राजदूत आणि पर्यटक येतात आणि ताजमहाल सोबत फोटो काढून घेतात.

या ताजमहालचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 40 एकरात गार्डनसह वसलेली ही वास्तू चार दिशांनी पाहिली तरी सारखीच दिसते. इमारतीच्या चारी बाजूला उभारलेले चार मनोरे एकाच उंचीचे असून एकसारखेच दिसतात. ते मुख्य इमारतीपासून सारख्याच अंतरावर आहेत. बागेची रचना चारही बाजूला एकसारखीच आहे.

ताजमहालाची उंची 171 मीटर असून ही इमारत म्हणजे इण्डो-इस्लामिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत.याशिवाय तुर्की, इराणी कलेचाही प्रभाव या इमारतीच्या बांधकामावर पडलेला आहे.या इमारतीचे स्थापत्यशास्त्रज्ञ उस्ताद अहमद लाहौरी हे असून या वास्तु शास्त्रज्ञाकडून अशा प्रकारची दुसरी इमारत न बांधण्याचे शाहजहानने वचन घेतले होते, असे बोलले जाते. इतकेच नव्हे तर त्याला ही इमारत पूर्ण केल्यानंतर तुरुंगातही ठेवले होते, असे बोलले जाते. पण याला काही कागदोपत्री ऐतिहासिक पुरावा नाही.

ताजमहालचा इतिहास:

इ.स. 1983 साली युनेस्कोने ताजमहालला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आणि ताजमहालाचे महत्त्व संपूर्ण जगासमोर आले. या ताजमहालाच्या निर्मितीचा इतिहास आपण थोडक्यात पाहू—-

दिल्लीचा बाद‌शाह जहांगीर आणि राणी मानमती यांचा कर्तबगार पुत्र शाहजहान यांचा जन्म 5 जानेवार 1592 रोजी झाला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या शाहजहानच्या अकबराबादी महल, कंदाहारी महल, मुमताज महल, हसिना बेगम साहिबा, मुती बेगम साहिबा, फतेपुरी मेहल साहिबा लीलावती बाईजी इत्यादी दहा राण्या होत्या. या दहा राण्यांत मुमताज महल ही राणी अप्रतिम सौंद‌र्यवती होती. शाहजहानची ती सर्वात आवडती राणी होती. तिचा जन्म 1593 साली झाला होता; तर विवाह 1612 साली झाला. इ.स. 1631 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी मुमताज महलचे आकस्मिक निधन झाल्याने शाहजहानच्या ही गोष्ट खूप जिव्हारी लागली. बराच वेळ ते उद्‌विग्न मनस्थितीत असायचे. खूप चिंतन केल्यानंतर शाहजहानने बेगम मुमताजच्या आठवणीखातर एक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. हे स्मारक म्हणजेच ताजमहाल होय. ताजमहाल किंवा ताजमहल या नावातच बेगम मुमताज महलचे नाव सामावलेले आहे. शाह‌जहानचे मूळ नाव शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम असून 19 जानेवारी 1628 रोजी शाहजहान दिल्लीच्या गादीवर बसला. 31 जुलै 1658 रोजी शहाजहानची सत्ता संपुष्टात आली. शाहजहानचा पुत्र औरंगजेब याने शाहजहानवर आक्रमण करून शाहजहानला तुरुंगात डांबून स्वत: औरंगजेब दिल्लीचा बाद‌शाह झाला. 22 जानेवारी 1666 रोजी शाहजहानचा मृत्यू तुरुंगातच झाला. एक उत्तम कलाकृती निर्माण करणाऱ्या बाद‌शाहाला आयुष्यातील शेवटची 8 वर्षे तुरुंगात काढावी लागली. याहून दुदैव ते कोणते ?

बेगम मुमताज महलच्या मृत्यूनंतर लगेच इ.स. 1632 मध्ये बाद‌शाहने ताजमहालच्या बांधकामास सुरुवात केली. स्थापत्य विशारद उस्ताद अहमद लाहौरीने तयार केलेल्या ताजमहलच्या प्रतिकृतीचा कच्चा आराखडा बाद‌शाह शाहजहानच्या समोर ठेवला. शाहजहानला तो आवडला आणि लगेच ताजमहालच्या बांधकामास सुरुवात झाली.ताजमहालचे बांधकाम करण्यासाठी संपूर्ण संगमरवरी द‌गड वापरण्याचे ठरले. राजस्थानातील मकराना या शहरातून पांढरा शुभ्र चकचकीत, सौंद‌र्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि कलानुसर करण्यास योग्य असा संगमरवरी दगड आणला गेला. याशिवाय चीनमधून, आशिया खंडातील अन्य देशातून गाढवांच्या पाठीवरून दगड आणले गेले. याशिवाय एक हजारहून अधिक हत्ती बांधकामाच्या कामात खपत होते.बांधकामासाठी वीस हजार मजूर दररोज काम करत होते.हे काम जवळजवळ बावीस वर्षे चालू होते. 1932 साली सुरु झालेले काम 1953 साली पूर्ण झाले. शाहजहान यांचे स्वप्न सत्यात उतरलेले त्यांनी उघड्या डोळयांनी बघितले; पण पुढे पाच वर्षांतच शाहजहानची सत्ता औरंगजेबने एक हाती काढून घेतली आणि शाहजहानला तुरुंगात डांबले. इतकी सुंदर वास्तू निर्माण करणाऱ्या राजाला अखेरचे दिवस त्याच्याच मुलग्यामुळे – औरंगजेबमुळे तुरुंगात काढावे लागले.

इ.स. 1653 साली ताजमहाल बांधून पूर्णत्वास आला.तेव्हा त्या इमारतीच्या बांधकामाचा खर्च 32 मिलियन भारतीय रुपये इतका आला. 1 मिलियन म्हणजे 10 लाख रुपये आणि 32 मिलियन म्हणजे 320 लाख रूपये. म्हणजेच 3 कोटी 20 लाख रुपये. तत्कालीन रूपयाचे मूल्य विचारात घेता ही रक्कम किती अवाढव्य आहे याची कल्पना येईल.

काही ठिकाणी ताजमहाल बांधण्यासाठी 1653 साली 50 लाख रुपये खर्च आला होता. असाही उल्लेख आहे.

ताजमहालचे प्रदूषण:

जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेल्या ताजमहालाला आज प्रदूषणाचा विळखा पडत आहे. ताजमहालच्या शेजारून वाहत असलेली यमुना नदी अस्वच्छ आहे. तिचे पाणी पिण्यास कोणत्याही ऋतूत शुद्ध अवस्थेत नसते. ही नदी म्हणजे सांडपाण्याचा नाला झाला आला आहे. कीटाणूंचा अड्‌डा झाला आहे.

ताजमहालच्या जवळच पाच किलोमीटरवर आग्रा शहर आहे. या शहरातील कारखान्यांतून निघणारा धूळ, धूर वाढत्या मोटारगाड्यांतून निघणारा धूर यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. मलमूत्रांचे मोठ्या प्रमाणात होणारे विसर्जन आणि त्यातून निघणारा दुर्गंधयुक्त वायू यामुळेही प्रदूषण वाढतच आहे.

या सर्व प्रदू‌षणाच्या विळख्याचा परिणाम ताजमहालावर होत आहे. ताजमहालाचा पांढरा शुभ्र रंग हळूहळू पिपळा पडत चालला आहे. संगमरवरी इमारतीवर काळे ठिपके पडत आहेत. हा प्रदूषणाचा विळखा तोड‌ण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे. त्याच बरोबर सुज्ञ नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. प्रदूषणाचा परिणाम केवळ इमारतींवरच होतो असे नाही. माणसाला अनेक श्वसनाचे रोग होत आहेत.कॅन्सर होत आहे. याचे एक कारण प्रदूषण हे आहे.

शाहजहान यांची वंशावळ:

बाबर हा मूळ मुघल सम्राट भारतात आला. त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून भारतावर सतरा स्वाऱ्या करून भारतातील संपत्ती लुटली. हुमायूनचा मुलगा अकबर हा मोठा पराक्रमी होता. अकबराचा नवरत्न दरबार जगप्रसि‌द्ध आहे. अकबराचा मुलगा जहांगीर अकबर नंतर दिल्लीचा बादशाह झाला. जहांगीरनंतर त्याचा मुलगा शाहजहान दिल्लीचा बादशाह झाला. शाहजहानचा मुलगा औरंगजेब हा क्रूर आणि कपटी होता. तो निर्दयी होता. औरंगजेब दिल्लीच्या गादीवर बसल्यावर त्याने स्वतःच्या बापाला(शाहजहानला) तुरुंगात डांबले होते. औरंगजेब नंतर मुघलशाहीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.पुढे मुघलशाही नष्ट झाली.

आवर्जून वाचावे असे काही

  1. वेरुळची लेणी:- ELLORA CAVES
  2. अजिंठा लेणी / Ajanta Caves
  3. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे व त्यांची प्रसिद्धी /Cities and their tourist attractions

 

Leave a comment